Uddhav Thackeray News : राज ठाकरेंशी वाढता 'घरोबा', उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? मनसेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत

Raj Thackeray Uddhav Thackeray news : काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्यासोबत विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा केली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी मनसेच्या महाविकास आघाडीतील एन्ट्रीबाबत काँग्रेससमोर शब्द टाकल्याचेही बोलले जात होते. पण आता मनसे नेते आणि राज ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यानं मोठा दावा केला आहे.
Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार वारे वाहू लागले आहेत. यातही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.शिवसेनेच्या बंडानंतर पहिल्यांदाच होत असलेले बीएमसीच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मनसेसोबत युतीचे संकेत दिले आहेत. याचदरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीबाबत मनसे नेत्यानं मोठं विधान केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्यासोबत विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा केली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी मनसेच्या महाविकास आघाडीतील एन्ट्रीबाबत काँग्रेससमोर शब्द टाकल्याचेही बोलले जात होते. पण आता मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू बाळा नांदगावकर यांनी मोठा दावा केला आहे.

मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी(ता.11) बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शाखा अध्यक्ष नेमणूक, बीएलओची नेमणूक अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जवळीकता,शिवसेना आणि मनसे युतीबाबत भाष्य केलं.

बाळा नांदगावकर यांना यावेळी पत्रकारांनी शिवसेना-मनसे युतीसाठी उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार का, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना नांदगावकर म्हणाले, एकंदरीत उद्धव ठाकरेंची यांची भूमिका बघितली तर ते दोघे भाऊ एकत्रित येण्याच्या दृष्टीने आहे. त्यासाठी ते काहीही निर्णय घेऊ शकतील असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र,अजून या मुद्यावर चर्चा नाही, असेही त्यांनी सांगितलं.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
OBC Politics : 'तीन वर्षांत मराठा समाजाला 25 हजार कोटी अन् ओबीसींना अडीच हजार...', ओबीसी नेता संतापला

यावेळी बाळा नांदगावकर यांना मनसे महाविकास आघाडीत सहभागी होणार का? काँग्रेससोबत जाणार का? असेही सवाल करण्यात आले. यावर ते म्हणाले, हा हायकमांडचा विषय आहे, त्यावर ते बोलतील. पण, विचारसरणीचा मुद्दा असतो, ध्येयधोरणाचा मुद्दा आहे. दोन पक्ष अजून एकत्र आलेले नाहीत, त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही, असे उत्तर देत मनसेच्या बाळा नांदगावकरांनी मनसे आणि महाविकास आघाडीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला.

नांदगावकर म्हणाले, आम्हांला ठाकरे बंधू, दोघे भाऊ मनाने एकत्रित येताना दिसून येत आहे, त्यांचा एक पक्ष आहे, आमचा एक आहे. शिवसेनेची परंपरा आहे की, ते दसरा मेळावा करतात, आम्हीही आमचा पक्ष स्थापन केल्यापासून गुढी पाडवा मेळावा करतो. आपले आपले विचार आपल्या मंचावरून मांडतो. त्यामुळे मला असे वाटत नाही की, त्यांनी काही निमंत्रण दिले आहे, ते दोन्ही नेते एकमेकांच्या मंचावरून बोलतील, अशी रोखठोक भूमिकाही नांदगावकर यांनी दसरा मेळाव्याबाबतच्या चर्चांवर मांडली.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
Local Body Elction : मँचेस्टर नगरीत शिवसेना ठरणार भाजपची डोकेदुखी, महायुतीचा निर्णय आज शक्य

शिवसेना आणि मनसे युतीबाबत अजून काहीच झालेले नाही, त्यामुळे जर तर वर काय बोलणार, असंही नांदगावकर यांनी म्हटलं. तसेच कोणताही पक्ष स्थानिक पातळीवरच्या लोकांशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चर्चा करत असतोच. दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने बोलताना, आमचा गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे, ते त्यांची भूमिका मांडतील आणि आम्ही ऐकू असेही नांदगावकर यांनी म्हटले.

शिवतीर्थावर झालेल्या राज ठाकरे आणि उद्वव ठाकरे भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये यांच्या 5-10 मिनिटे चर्चा झाली. तुम्ही सतत बातम्या दाखवत आहात, त्यामुळे तशी देखील चर्चा झाली असेल. मी काही तिथे नव्हतो, इतर कुणीही नव्हते. त्यामुळे नेमकी काय चर्चा झाली, हे मला माहिती नसल्याचे बाळा नांदगावकर यांनी म्हटले.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
Nitin Gadkari News : माझ्याविरोधात 'पेड पॉलिटिकल कॅम्पेन' चालविले! नितीन गडकरी यांचा मोठा दावा, कुणावर साधला निशाणा?

राज ठाकरेंच्या आई या उद्धवजींच्या मावशी आहेत, काल त्यांना भेटण्यासाठी ते आले होते. त्यांच्यात बोलणे झाले, साहेबांबरोबर पण त्यांचे बोलणे झाले असे म्हणत दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटे राजकीय चर्चा झाल्याचेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे गेले होते. त्यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब हो दोन मोठे नेतेही होते. मागील 15 दिवसांत उद्धव ठाकरे हे दुसऱ्यांदा राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यातील युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्यासाठी ही भेट असल्याची चर्चा आहे.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
Unmesh Patil : बड्या नेत्याच्या कार्यालयातून दीड-दोन कोटींची रोकड चोरीला, उन्मेष पाटील यांचा खळबळजनक दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यातील युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्यासाठी ही भेट असल्याची चर्चा आहे. तसेच राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निमंत्रण देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होणाऱ्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे हे देखील पहिल्यांदा हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीलागेल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com