Mahatma Gandhi : गांधीजींचा मारेकरी गोडसेच्या समर्थनासाठी सावरकर सरसावले

Ranjeet Savarkar : रणजीत सावरकरांच्या दाव्याने खळबळ, म्हणाले नथुराम गोडसे मारेकरी नाहीच!
Nathuram Godse, Mahatma Gandhi
Nathuram Godse, Mahatma GandhiSarkarnama
Published on
Updated on

Nathuram Godse and Savarkar News :

Mumbai : महात्मा गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे पुन्हा एकदा चर्चेत याला आहे. याला निमित्त ठरलंय 'मेक शुअर गांधी इज डेड' हे रणजीत सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं. या पुस्तकातून त्यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडाली असून गांधीजींचे खरे मारेकरी कोण, हे सरकारनं शोधावेत असं आवाहन केलं आहे.

स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांचे वंशज रणजीत सावरकर यांनी मोठा दावा केला आहे. महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसे (Nathuram Godse) याच्या पिस्तुलीतील गोळीनं झालेली नाही. यासाठी त्यांनी वरील पुस्तकात काही दावे केले आहेत. आता रणजीत सावरकरांच्या (Ranjeet Savarkar) या दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे.

Nathuram Godse, Mahatma Gandhi
Lok Sabha Election 2024 : भाजपचे 'ओबीसी कार्ड', संजय धोटेंपर्यंत येऊन पोहोचला शोध !

नथुराम गोडसकडे 9 MMचं पिस्तुल होतं आणि गांधीजींना (Mahatma Gandhi) लागलेल्या गोळ्या 4.23MM आणि 6.5MM पिस्तुलीतून झाडलेल्या होत्या, असा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे. त्यामुळे गांधीजींची हत्या नथुराम गोडसेनं केली नाही, असा दावा रणजीत सावरकर यांनी 'मेक शुअर गांधी इज डेड' (Make Sure Gandhi is Dead) या पुस्तकातून केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी गोडसेचा उल्लेख आदरार्थी केला आहे.

जर नथुराम गोडसेनं गोळी झाडली असती तर ती थेट घुसली असती. तसं झालेलं नाही. गांधीजींचे मारेकरी कुणीतरी वेगळे आहेत आणि सरकारनं त्यांना लपवलं आहे. म्हणनच सरकारनं याची कसून चौकशी करावी, अशी मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गांधीजींची हत्या 30 जानेवारी 1948 रोजी झाली. त्यांच्या हत्येत एकूण 9 आरोपी होते. त्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची निर्दोष सुटका करण्यात आली. तर नथुराम गोडसे आणि नारायण आपटे या दोघांना फाशी देण्यात आली आणि सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यात नथुराम गोडसेचा भाऊ गोपाळ गोडसेचाही समावेश होता.

गांधीजींच्या हत्येनंतर सरकारने कपूर आयोग नेमून चौकशी केली होती. आताही गांधीजींची हत्या नक्की कुणी केली, हे शोधण्यासाठी सरकारने दुसरा आयोग नेमावा आणि दडपलेले पुरावे बाहेर काढावेत, अशी मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे.

नथुराम गोडसे देशातील पहिला अतिरेकी

रणजीत सावरकरांच्या दाव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड संतप्त झाले आहेत. असल्या लेखकांवर न बोललेलं बरं असं म्हणत नथुराम हा भारतातील पहिला अतिरेकी असल्याचा आरोप केला. आज गोडसेनं मारला नाही म्हणतात, उद्या महात्मा गांधी तिथे नव्हतेच असेही म्हणतील. अभ्यास कमी असणाऱ्या आणि अकलेचे तारे तोडणाऱ्यांवर काय बोलणार, अशी संतप्त प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.

Nathuram Godse, Mahatma Gandhi
Narendra Modi : सोशल मीडियावर मोदींच्या नावाने 'बनवेगिरी'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com