Navi Mumbai : नवी मुंबईतही काँग्रेसला धक्का; माजी नगरसेविकेचा भाजपमध्ये प्रवेश

BJP Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर आउटगोइंग सुरू आहे. आता ही लाट नवी मुंबईमध्येही आली असून, माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांनी विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आहे.
Anita Shetty in BJP
Anita Shetty in BJPSarkarnama

Navi Mumbai Political News :

नवी मुंबईत भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची ताकद वाढली आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भाजप प्रवेशासाठी भाजप संयोजक विनय सहस्रबुद्धे आवर्जून उपस्थित होते. ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडे जाणार की शिवसेनेकडे राहणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, उमेदवार म्हणून विनय सहस्रबुद्धे (Vinay Sahasrabuddhe) यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे विनय सहस्रबुद्धे यांची उपस्थिती आणि माजी नगरसेविका भाजप प्रवेश याला नवी मुंबईत महत्त्व आले आहे.

Anita Shetty in BJP
Bachchu Kadu : लोकसभेत सगळ्या जागा भाजप लढवेल, बच्चू कडूंचा खळबळजनक दावा !

अनिता शेट्टी (NMMC former Congress corporator Anita Shetty) या नवी मुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांचे हात बळकट झाले आहेत. विशेष म्हणजे नेरुळ विभागात भाजपची ताकद वाढली आहे. अनिता शेट्टी दक्षिण भारतीय असल्याने दक्षिण भारतीय मतदारांचा कल भाजपकडे वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांचे पती काँग्रेसचे स्थानिक नेते आहेत. ते चारवेळा काँग्रेसचे नगरसेवक होते. अनिता शेट्टी भाजपमध्ये गेल्या असल्या तरी संतोष शेट्टी (Santosh Shetty) काँग्रेसमध्येच आहेत. आता अनिता शेट्टी यांच्याशी जोडलेल्या आणखी एक नगरसेविकाही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. मात्र, याला अजून दुजोरा मिळालेला नाही.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते. त्यामुळे भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाला हात दाखवला आहे. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा (Milind Deora) शिवसेनेत गेले. बाबा सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपचे झाले. त्यानंतर बसवराज पाटील (Basavraj Patil) यांनीही भाजपची वाट धरली. राज्यातील काँग्रेसचे अनेक नेते पक्षाला सोडत असताना नवी मुंबईतील नगरसेविकेनेही तोच मार्ग अवलंबल्याने ही काँग्रेससाठी धोक्याची घंटी मानली जाते.

(Edited by Avinash Chandane)

R

Anita Shetty in BJP
Basavraj Patil News : भाजपमध्ये दाखल होताच धाराशिवसाठी बसवराज पाटलांनी दंड थोपटले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com