Ganesh Naik Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी नाक दाबलं... गणेश नाईकांच्या शिलेदारांपुढे शिवसेना प्रवेशाशिवाय पर्यायच ठेवला नाही!

Ganesh Naik Vs Eknath Shinde : नवी मुंबई महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरून भाजपचे आमदार गणेश नाईक आणि शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे
Eknath Shinde Vs Ganesh Naik
Eknath Shinde Vs Ganesh NaikSarkarnama
Published on
Updated on

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या प्रभागरचनांमध्ये जुने प्रभाग फुटले आहेत. वनमंत्री गणेश नाईक समर्थक नगरसेवकांना या बदलांचा मोठा फटका बसला आहे. यावर मोठ्या प्रमाणात आक्षेपही नोंदवले आहेत. परंतु रचनेमध्ये बदल झाले नाहीत, तर काही नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय पर्यायच नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत घोडेबाजार रंगणार असल्याची चर्चा रंगली आहे.

नवी मुंबई महापालिकेची जानेवारीत निवडणूक होण्याची शक्यता आहे. या प्रभागरचनेवर उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांचा प्रभाव प्रभाव असल्याचा आरोप नाईक समर्थकांकडून केला जात आहे. 4 नगरसेवकांचा 1 प्रभाग तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये विचित्र पद्धतीने प्रभागांची रचना केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्याचा सर्वाधिक फटका भाजपच्या नगरसेवकांना बसला आहे.

यावर हरकती नोंदवण्याच्या प्रक्रियेत भाजपकडून सर्वात जास्त हरकती घेण्यात आल्या आहेत. प्रभागांची रचना, नकाशा व्याप्तीनुसार नसल्याच्या जवळपास 500 पेक्षा जास्त हरकती भाजपकडून घेण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत त्यावर सुनावणी अपेक्षित आहे. मात्र बदल न झाल्यास नगरसेवकपदावर पाणी सोडावे लागेल, ही बाब अनेकांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे आडबाजूने शिवसेनेच्या नेत्यांसोबत हातमिळवणीची चर्चा आहे.

Eknath Shinde Vs Ganesh Naik
Thane News : 25 लाखांसाठी तगादा अन् ठाण्याचे उपायुक्त अलगद जाळ्यात... शंकर पाटोळेंच्या अटकेची इनसाईड स्टोरी!

दोन्ही पक्षांचे जिल्हाप्रमुख भिडले :

खुद्द शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी याबाबतचा दावा केला आहे. जिल्हाप्रमुख किशोर पाटकर म्हणाले, शिवसेनेत भाजपसहीत इतर पक्षातील 10 ते 12 नगरसेवक येण्यासाठी तयार आहेत. नाईक समर्थकांची आर्थिक, मानसिक कोंडी झाली आहे. जनहितांच्या कामासाठी अनेक जण शिवसेनेत येत आहेत.

नवी मुंबईचे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी मात्र पाटकर यांचा दावा खोडून काढला. ते म्हणाले, कोणत्या पक्षात कोणी जावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण प्रभागरचना आणि पक्षप्रवेशाचा काहीही संबंध नाही. हरकतीनुसार सुधारणा केल्या आहेत, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. आमच्या पक्षातील कोणत्याच कार्यकर्त्यांमध्ये द्विधा मनःस्थिती नाही.

Eknath Shinde Vs Ganesh Naik
Thane Pattern: एकनाथ शिंदे देणार ठाकरेंना धक्का; BMC निवडणुकीत 'ठाणे पॅटर्न’ राबवणार

कोणत्या प्रभागांना फटका?

ऐरोली, दिघा, रबाळे, तुर्भे या भागातील प्रभागांना अधिक फटका बसला आहे. तुर्भेमध्ये नव्याने 14 गावांचा समावेश केल्यामुळे नवी मुंबईतील क्षेत्रफळानुसार हा सर्वात मोठा प्रभाग झाल्याची चर्चा आहे. याशिवाय वाशी आणि सानपाडा एकत्र केले असून, रस्त्याच्या पलीकडे असणारा तुर्भे गावाचाही काही भाग जोडला गेल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जुईनगर, नेरूळ पूर्व आणि पश्चिम या परिसरातही प्रभागांची मोडतोड झाली आहे. सीवूड्सचा प्रभाग नेरूळला जोडण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटातर्फे हरकत नोंदवण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र :

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शनिवारी पक्षाचा मेळावा संपल्यानंतर नवी मुंबईतील पदाधिकारी आणि नगरसेवकांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत गरजूंची मदत करा, ज्या नगरसेवकांची कामे होत नसतील, अशांना पक्षात घेऊन त्यांची कामे करा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना केल्याचे समजते. तसेच पक्ष वाढवण्यासाठी जे जमेल ते करा, असा सल्लाही दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com