Navneet Rana Vs Yashomati Thakur and Bacchu Kadu : फडणवीसांच्या भेटीनंतर नवनीत राणांचा यशोमती ठाकूर अन् बच्चू कडूंवर पलटवार, म्हणाल्या...

Navneet Rana on Vidhan sabha Election : 'दगा एकही बार हो सकता है, बार नही हो सकता' असही नवनीत राणांनी म्हटलं आहे.
Navneet Rana Vs Yashomati Thakur and Bachu Kadu
Navneet Rana Vs Yashomati Thakur and Bachu KaduSarkarnama

Navneet Rana and Amaravati Loksabha Election Politics : लोकसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर आज पहिल्यांदाच अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या पराभूत उमेदवार आणि माजी अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीत त्यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीत नेमकं अपयश कशामुळे आलं, निवडणूक कशाप्रकारे पार पडली आणि पुढील कार्यपद्धती काय असावी याबाबतची चर्चा केल्याचे सांगितले. तसेच, मीडियाला प्रतिक्रिया देताना त्यांना बच्चू कडू, यशोमती ठाकूर यांनाही टोला लगावला.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू(Bacchu Kadu) यांनी नवनीत राणांच्या पराभवासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती. शिवाय निवडणूक निकालानंतरही बच्चू कडूंकडून वारंवार राणा दाम्पत्यावर निशाणा साधला जात आहे. यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, 'मला असं वाटत की मी कोणावरच काहीही बोलणार नाही. मी माझं काम जनतेसाठी करत आहे, कोणत्याही नेत्यासाठी करत नाही.

माझ्या जिल्ह्यात जे काही घडलं, माझी निवडणूक मी जनतेच्या भरवशावरच लढलेली आहे. मी कोणा दुसऱ्यांच्या भरवशावर निवडणूक लढले नव्हते. मी ज्यांना माझे नेते मानते ते म्हणजे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व माझ्यासोबतच होते, हे सगळं जनतेला माहीत होतं.'

Navneet Rana Vs Yashomati Thakur and Bachu Kadu
Navneet Rana met Devendra Fadnavis : 'मी 100 टक्के देशपातळीवर..' ; फडणवीसांच्या भेटीनंतर नवनीत राणांचं सूचक विधान अन् चर्चांना उधाण!

याशिवाय काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात बळवंत वानखेडे यांच्या विजयी मिरवणुकीत धनुष्य बाण चालवण्याची अॅक्शन करून नवनीत राणांना डिवचल्याचे दिसून आले होते. त्यावर आज नवनीत राणा म्हणाल्या, 'मी जे करते ते ओरिजनल आहे, आता ब्रॅण्डला कॉपी करणारे खूप जण येवून जातात. तर ब्रॅण्ड हा ब्रॅण्डच असतो. माझी कोणासोबतही लढाई नाही. मी जनतेची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात आली आहे आणि ती सेवा मी शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहे.'

तर बळवंत वानखेडेंना अमरावतीकरांनी नेमका का कौल दिला, यावर नवनीत राणांनी(Navneet Rana) 'मला असं वाटतं की जनतेने जो निर्णय घेतला असेल, तो त्यांच्या हिशोबाने बरोबर असेल आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. जो ज्यांचा मान आहे त्यांना भेटलाच पाहीजे.' अशी प्रतिक्रिया दिली.

Navneet Rana Vs Yashomati Thakur and Bachu Kadu
Bachchu Kadu on Ravi Rana : '...म्हणून रवी राणांमुळेच नवनीत राणांचा पराभव झाला' ; बच्चू कडुंचा खळबळजनक दावा!

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार -

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, 'संपूर्ण महाराष्ट्रात परत महायुतीचं सरकार येईल, त्यामध्ये कोणतीही शंका नाही. जे काही इतर लोक बोलत असतात ते केवळ ऐकण्यासाठी असतं. पण या राज्यात जर खरं कोणी काम करू शकतं, राज्यातील जनतेला न्याय देऊ शकतं, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकते तर ती केवळ आमची महायुती आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आहेत. दगा एकही बार हो सकता है, बार नही हो सकता.' असंही राणा यांनी बोलून दाखवलं

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com