मलिकांनी सांगितलं...1993 मध्ये कागदपत्रे बदलली पण इथं वानखेडे फसले!

आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी...
Nawab Malik and Sameer Wankhede
Nawab Malik and Sameer WankhedeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविषयी सर्व कागदपत्रे उच्च न्यायालयासह मुंबई पोलिस व विशेष तपास पथकाकडेही सादर केली आहेत. तर वानखेडे यांच्याकडून दाखवलेली जात असलेली कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. 1993 मध्ये त्यांनी कागदपत्रे बदलण्यास सुरूवात केल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

वानखेडे यांनी जुनी कागदपत्रे बदलून त्यावर खाडाखोड करत बनावट कागदपत्रे तयार केली आहेत. त्यांनी जन्मावेळचा दाखला दाखवायला हवा. पण ते नंतर तयार केलेला दाखला दाखवत आहेत. कागदपत्रे बदलताना त्यांच्या काही गोष्टी लक्षातच आल्या नाहीत. जन्मावेळची नोंदणी, जन्मदाखला या मुळ कागदपत्रांचे स्कॅनिंग मुंबई महापालिकेने केले आहे. ही बाब समोर आल्यानंतर मी स्वत: ही कागदपत्रे मिळवली आहेत. जन्मावेळच्या नोंदणीपासूनची सर्व कागदपत्रे सादर आहेत, असे मलिक यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

Nawab Malik and Sameer Wankhede
वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद अन् धर्म मुस्लिमच? शाळेचे दाखले व्हायरल

पहिल्या पत्नी धमकावले

समीर वानखेडे यांनी पहिल्या पत्नीला धमकावल्याचा आरोपही मलिकांनी केला आहे. पहिल्या पत्नीच्या भावाला एका ड्रग्ज पेडलरच्या मदतीने ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यात आले. त्यांचा फर्जीवाडा बाहेर येऊ लागल्यानंतर पत्नीने सत्य बाहेर आणू नये, यासाठी कुटुंबीयांनाही वानखेडे यांनी धमकावले होते. सर्वांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी त्यांनी दिल्याचा धक्कादायक आरोप मलिकांनी केला आहे.

दरम्यान, वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (N awab Malik) यांनी केला आहे. मलिक यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात (High Court) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. वानखेडेंचा शाळेचा प्रवेश अर्ज आणि शाळा सोडल्याचा दाखला याचीही कागदपत्रे मलिक यांनी दिली आहेत. गुरूवारी पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. या गोष्टी सिद्ध झाल्यानंतर वानखेडे यांनी नोकरी जाईल, याचा पुनर्रच्चार मलिकांनी यावेळी केला.

समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी मलिक यांनी आज उच्च न्यायालयात आणखी कागदपत्रे सादर केली. मलिक यांनी आज प्रतिज्ञापत्रही सादर केले असून, त्यात समीर वानखेडे यांचा शाळा प्रवेशाचा अर्ज आणि प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखलाही आहे. या दोन्ही कागदपत्रांमध्ये वानखेडे हे मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे. मलिक यांच्या वकिलांनी न्यायाधीश माधव जमादार यांच्यासमोर हे म्हणणे मांडले. यावर उद्या दुपारी 2.15 वाजता सुनावणी होणार आहे.

Nawab Malik and Sameer Wankhede
सरकारी अधिकाऱ्यांनो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच वापरा! सरन्यायाधीशांची सूचना

वानखेडे यांनी नुकतीच दिल्लीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेतली होते. वानखेडे यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे आयोगासमोर सादर केली आहेत. यानंतर बोलताना आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला म्हणाले होते की, समीर वानखेडे यांनी आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी महाराष्ट्र सरकार करणार आहे. ही कागदपत्रे वैध आढळल्यास त्याआधारे त्यांच्यावर कुणीही कारवाई करू शकत नाही.

Nawab Malik and Sameer Wankhede
लखीमपूर खीरीवरून सर्वोच्च न्यायालयाचा योगी सरकारला दणका

समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र म्हणजेच निकाहनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला होता. तसेच लग्नावेळी ते मुस्लिम होते, असा दावाही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी नुकतीच राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यांनी हलदर यांच्याकडे एक अर्जही केला होता. यानंतर हलदर यांनी वानखेडे यांना लगेचच क्लिनचिट दिली होती. हलदर म्हणाले होते की, मी त्यांची तक्रार पाहिली आहे. मला वाटते की ते अनुसूचित जातीमधील असावेत. धर्मांतर केल्याचे सर्व आरोप वानखेडेंनी फेटाळून लावले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com