Nawab Malik : नवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला!

Nawab Malik : मागील काही दिवसांपासून मलिकांवर कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार सुरू होत आहेत.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. मलिक यांना न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे मलिकांवर मागील काही दिवसांपासून कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मलिक यांच्या जामीन न्यायमूर्ती रोकडे यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली.

Nawab Malik
जळगावमध्ये ठाकरेंची ताकद वाढली.. सुरेशदादा जैन यांचा जामीन मंजूर ; गुलाबरावांच टेन्शन वाढणार...

नवाब मलिक यांच्यावर आरोप काय?

गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी कटरचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या संबंधित महिलेने 1999 या वर्षी मध्ये सलीम पटेल या व्यक्तिच्या नावे पॉवर ऑफ एटर्नी तयार केली होती. यानंतर पटेल याने पॉवर ऑफ एटर्नी गैरवापर करत हसीना पारकरच्या सांगण्याप्रमाणे गोवावाला कंपाउंडची जमीन नवाब मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विक्री केल्याचा आरोप आहे.

नवाब मलिकांनी हे आरोप फेटाळले आहेत. जमीन खरेदी ही कायेदेशीर व सर्व नियमांचे पालन करत केल्याचा दावा मलिकांनी केला आहे. तपासाला पाच महिने होऊन गेले तरीही आरोपाबाबत सबळ पुरावे समोर आणले नसल्याचे मलिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला नाही. यामुळे आज काय निर्णय येतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Nawab Malik
Bawankule : महाविकासच्या काळात पीक विम्यात भ्रष्टाचार; बावनकुळेंचा दावा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com