Nawab Malik: निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या मलिकांबाबत अजित पवार मोठा निर्णय घेणार

Ajit Pawar NCP Political News : माजी मंत्री नवाब मलिक यांच्या निवडणूक लढवण्याच्या ठाम भूमिकेमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटासह महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar, Nawab Malik
Ajit Pawar, Nawab Maliksarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर आमदार नवाब मलिक यांनी अजित पवारांना साथ दिली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट जाहीर झालं आहे.

पण आता माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हेही शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत.मात्र, त्यांच्या उमेदवारीला महायुतीतील भाजप आणि शिवसेनेकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे.याचवेळी आता मलिक यांनी काहीही झालं तरी आपण निवडणूक लढणारच असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

माजी मंत्री नवाब मलिक यांच्या निवडणूक लढवण्याच्या ठाम भूमिकेमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटासह महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.या सगळ्या घडामोडींनंतर शनिवारी(ता.26)उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी नवाब मलिक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

या सर्व नेत्यांची मलिक यांच्यासोबत बंद दरवाजाआड काहीवेळ चर्चा झाली.त्यात अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मलिकांना निवडणूक लढण्याविषयी विनंती केल्याची माहिती समोर येत आहे. मलिकांनी आपल्याला पक्षाने तिकीट दिलं तर घड्याळ चिन्हावर अन्यथा अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितलं आहे.

Ajit Pawar, Nawab Malik
Sharad Pawar Vs BJP : येवला इफेक्ट! भाजपच्या गिरीश महाजनांना मोठा धक्का; गणेश गितेंच्या हाती शरद पवारांची 'तुतारी'

या भेटीनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.मी निवडणूक लढवण्यावर ठाम असून,मी निवडणूक लढणार, लढणार आणि लढणारच असं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतेमंडळींना सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींकडून नवाब मलिकांबाबत रविवारी(ता.27) महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.नवाब मलिक हे येत्या मंगळवारी 29 भरणार आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे. मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभेमधून अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com