नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही!

शिवसेनेने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला, अनिल देशमुख यांचा राष्ट्रवादीने राजीनामा घेतला. मग मलिकांचा राजीनामा का घेतला नाही.
 chandrkant patil, Nawab Malik
chandrkant patil, Nawab Maliksarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik)यांचे बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध आहेत. त्यांना ईडीने अटक करुनही ते राजीनामा देत नाहित, महाविकास आघाडी सरकार त्यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे हे सरकार बॉम्बस्फोटातील आरोपींना समर्थन देत आहे,'' असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrkant patil)शनिवारी केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ''नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्यांच्या मागणीसाठी आंदोलन केले. पण तरीही त्यांनी राजीनामा दिला नाही, आम्ही नवाब मलिकांच्या राजीनाम्यांसाठी तीव्र आंदोलन करु, त्यांच्या राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,''

''आपल्या मंत्र्यांवर आरोप झाल्याने शिवसेनेने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला, अनिल देशमुख यांचा राष्ट्रवादीने राजीनामा घेतला. मग मलिकांचा राजीनामा का घेतला नाही. याचा विचार शिवसेनेने याचा विचार करावा,'' असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा देण्यासाठी भाजपचा अनुकूल नाही, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली होती. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ''लहान मुलालाही काहीही बोलण्याचा अधिकार आहे. हे तर मुख्यमंत्री आहेत. भाजप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही त्यासाठी पाठपुरावा करु,''

 chandrkant patil, Nawab Malik
Russia-Ukraine War : भारतीय विद्यार्थ्यांना रोमानियात हलवले..

''पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते ज्या मेट्रो स्टेशनला भेट देणार आहेत, त्या मेट्रो स्टेशनला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मुंबई आणि दिल्लीला पाठवली आहे,'' असे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com