मलिक म्हणाले, आता वानखेडे अन् कुटुंबीयांवर बोलणार नाही!

मलिकांना गुरूवारी उच्च न्यायालयात झटका बसला आहे.
Dnyandev Wankhede, Nawab malik
Dnyandev Wankhede, Nawab malikSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना गुरूवारी उच्च न्यायालयात (High Court) झटका बसला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल जाहीरपणे बोलण्यास मलिकांना 9 डिसेंबरपर्यंत मनाई करण्यात आली. न्यायालयाने काही मुद्यांवर आक्षेप नोंदवल्यानंतर मलिकांच्या वकिलांनीच पुढील सुनावणीपर्यंत मलिक वानखेडेंविषयी काही बोलणार नाही, असं सांगत एक पाऊल मागे घेतले.

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. यावरील सुनावणी पूर्ण झाली होती आणि न्यायाधीश माधव जामदार यांनी निकाल राखून ठेवला होता. मलिक यांना आपण व आपल्या कुटुंबीयांबद्दल बोलण्यास निर्बंध घालावेत, अशी मागणी ज्ञानदेव वानखेडे यांनी केली होती. उच्च न्यायालयाने म्हटले होते की, मलिक यांच्यावर पूर्णपणे निर्बंध घालता येणार नाहीत. परंतु, वानखेडे यांच्याबद्दल जाहीरपणे विधाने करताना मलिक यांनी योग्य काळजी घ्यावी.

Dnyandev Wankhede, Nawab malik
माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे बारा आमदार फुटले अन् मास्टरमाईंड प्रशांत किशोर!

या निर्णयाविरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायाशीध एस. जे. काथेवाला आणि न्यायाधीश मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयाने काही नाराजी व्यक्त केली. वानखेडे यांच्यावतीने विधिज्ञ विरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. मलिकांनी बेजाबाबदारपणे ट्विट करणे सुरूच ठेवले आहे. ट्विट करताना कोणतीही खातरजमा केली जात नाही, असं सराफ यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने बदनामीकारक असल्याचे दाखवा, तसेच असेल तर लगेच मनाई केली जाईल, असं न्यायालयं म्हणाले.

सराफ यांनी न्यायालयासमोर मलिकांच्या अनेक ट्विटचे वाचन केले. त्यानंतर ते न्यायालयासमोर सादर केली. त्यानंतर न्यायालयाने ट्विटबाबत अधिकृत तक्रार केली आहे का, अशी विचारणा मलिकांच्या वकिलांना केली. त्यावर अॅड. कार्ल तांबोली यांनी दक्षता समिती चौकशी करत असल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयानेच त्यांना सुनावणी सुरू असेपर्यंत वानखेडे यांच्याविषयी कोणतंही ट्विट न करण्याचे बंधन स्वत:च घालून घेणार की आम्ही ऑर्डर देऊ, अशी विचारणा केली.

Dnyandev Wankhede, Nawab malik
पाईपमधून पाणी नव्हे नोटा अन् दागिने आले बाहेर; ACB चे अधिकारीही चक्रावले (व्हिडीओ)

न्यायालयाच्या या पवित्र्यानंतर तांबोळी यांनी न्यायालयाला मलिक सुनावणीदरम्यान वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी थेट किंवा अप्रत्यक्षपणे ट्विट करणार नसल्याचे सांगितले. आता या प्रकरणावर नऊ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे मलिकांना नऊ तारखेडपर्यंत वानखेडे यांच्याविषयी कोणतंही भाष्य किंवा ट्विट करता येणार नाही. मागील अनेक दिवसांपासून मलिकांकडून जवळपास दररोज वानखेडे यांना ट्विट किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लक्ष्य केलं जात आहे.

मलिक सतत वानखेडे यांच्याबाबत रोज नवीन खुलासे करत आहेत. यामध्ये ज्ञानदेव वानखेडे यांचे नाव दाऊद आहे आणि समीर यांनी मुस्लिम असूनही राखीव गटातून केंद्र सरकारची नोकरी मिळवली, असा आरोप केला आहे; मात्र हा आरोप आधारहिन आहे. मलिक निराधार आरोप करून आमची प्रतिमा मलीन करीत आहेत, असा आरोप वानखेडे यांनी केला आहे. मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com