Ajit Pawar Press Conference News : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. यानंतर सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
यावेळी सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, राज्यामध्ये पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे काम करणार आहे. त्या दृष्टीने पाच तारखेला आम्ही जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्षांची बैठक घेणार आहे. यावेळी सुनिल तटकरे यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) युवक अध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती केली. तसेच प्रदेश प्रवक्तेपदी अमोल मिटकरी, आनंद परांजपे, संजय तटकरे यांची नियुक्ती केली.
या वेळी अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, काल रात्रीपासून काही वेगळ्या घटना सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या भल्याची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भल्याची आहे, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाने मला अधिकृतरित्या कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. त्याआधी सप्टेंबर २०२२ मध्ये दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात माझी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आम्ही 'जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. संघटनात्मक निवडणूक न घेता त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती. मात्र, आता आम्ही जयंत पाटील यांना या जबाबदारीतून मुक्त करत आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.