Jitendra Awhad: आव्हाडांच्या वादग्रस्त विधानानंतर ठाण्यात राडा; अजित पवार गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Thane Ajit Pawar Group Aggressive : जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद ठाण्यात उमटले.
Jitendra Awhad - NCP Ajit Pawar Group
Jitendra Awhad - NCP Ajit Pawar Group Sarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर-

Thane News : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या बेधडक विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. सध्या तर ते भाजप आणि शिंदे गटापेक्षा रा्ष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर टीका करण्यात सगळ्यात पुढे असतात.आता त्यांनी शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात प्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे नवा वाद पेटला आहे. राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते असे विधान केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत होती. ठाण्यात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी श्रीरामांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद ठाण्यात उमटले. शिवसेना शिंदे गटाने त्यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आमदार आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद बंगला या निवासस्थानाबाहेर जमून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कार्यकर्ते महाआरती करून आव्हाडांचा निषेध नोंदविण्याच्या तयारीत असताना वर्तकनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. यानंतर अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली.

Jitendra Awhad - NCP Ajit Pawar Group
NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादीचा अजित पवार गट टाकणार 'टाॅप गिअर' ; जिल्हाध्यक्षांना मिळणार 'हे' मोठं गिफ्ट

ठाण्यात थेट जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे शरद पवार आणि अजित पवार गट(NCP Ajit Pawar Group) एकमेकांच्या विरोधात पहिल्यांदाच अशाप्रकारे आमनेसामने आले आहेत. त्याच्यावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ट्विट करत ठाकरे पितापुत्रांवर निशाणा साधला आहे. तसेच तुमच्या हिंदुत्वाशी अगदी बरोबर नाळ जोडतायत ना, असा चिमटा ही म्हस्के यांनी काढला आहे.

माजी महापौर आणि शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, आव्हाड डोक्यावर पडला आहे का असं लोक आम्हाला विचारतात. असे म्हणताना आता तर आमची खात्रीच पटली आहे की, लोक खरंच बोलतात काय खाऊन बोलतोस तू तुझं तुला कळतं का वाटेल ते बोलताना नरडं थोडं जळतं का दिवस-रात्र मांसाहार वरपणारा तू तुला कशी कळेल रामायणाची खरी कथा तुझ्यासारखे नतद्रष्ट आहे, असे नमूद करत, रामाचं नाव घेतात हीच राम भक्तांची व्यथा असून मोठे रामायणाचे दाखले देतोस ग्रंथ वाचला का विचारतोस तू असा सवालही म्हस्के यांनी एकेरी उल्लेख करत आव्हाडांना केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याशिवाय,रामायणाचे सगळे ग्रंथ कोणी लिहिले कधी स्वतः बघतोस का रे तू असा प्रश्न उपस्थित केला आहे.तसेच म्हस्केंनी रामायण लिहिणारे बहुजनच होते असे ही नमूद केले आहे. पण सत्य आणि धर्मनिष्ठ होते. तुझ्यासारखे त्यांच्या डोक्यात नको ते किडे नव्हते. असे ही म्हटले आहे. तूच एकदा डोक्यावरचा रुमाल काढून रामायण वाच आणि मग ज्ञान पाजळत गावभर थय थय नाच असे म्हटले आहे.

हाच मुद्दा पकडून म्हस्के यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र व आमदार आदित्य ठाकरे यांना लक्ष केले. पुढे बोलताना, म्हस्के यांनी अहो हिंदुत्ववादी ठाकरे, हे बरोबर बरोबर बोलतायत ना असाही प्रश्न विचारत, तुमच्या हिंदुत्वाशी अगदी बरोबर नाळ जोडतायत ना. असेही विचारले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Jitendra Awhad - NCP Ajit Pawar Group
Amal Mahadik- Satej Patil : अमल महाडिकांचा रुद्रावतार; सतेज पाटलांवर गंभीर आरोप करत केली 'ही' मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com