Amal Mahadik- Satej Patil : अमल महाडिकांचा रुद्रावतार; सतेज पाटलांवर गंभीर आरोप करत केली 'ही' मागणी

Kolhapur Politics : 'आमदार सतेज पाटील यांचे नाव गुन्हेगारांच्या यादीत घालावे...'
Satej Patil, Amal Mahadik
Satej Patil, Amal MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : नेहमी शांत संयमी भूमिका घेणारे माजी आमदार अमल महाडिक यांनी काल कार्यकारी संचालकांना झालेल्या मारहाण प्रकरणावर अतिशय संतापलेल्या भूमिकेत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यकारी संचालक यांना मारहाण करण्यात सतेज पाटील यांनीच कार्यकर्त्यांना फुस लावली आहे. त्यांनीच या प्रकाराला खतपाणी घातले आहे असा आरोप करत आमदार सतेज पाटील यांचे नाव गुन्हेगारांच्या यादीत घालावे, अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी केली आहे. आज सभासदांचा ऊस तोडणीतील सर्व पुराव्यानिशी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे.

छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार अमल महाडिक यांनी बुधवारी (ता.3) सभासदांचा ऊसतोडणीतील सर्व पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकर्‍यांना पुढे करून गुंडगिरी करत, दहशत पसरवण्याचा आमदार सतेज पाटील यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही महाडिक यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकर्‍यांसाठी अनेक आक्रमक आंदोलनं केली. पण माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही कारखान्याच्या कर्मचार्‍याला मारहाण केली नाही. मात्र शेतकर्‍यांना पुढं करून आमदार सतेज पाटील गुंडगिरी करत, दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी केला.

Satej Patil, Amal Mahadik
Satej Patil Vs Uday Samant : काँग्रेसला धक्का! 'तब्बल 9 आमदार संपर्कात, आणखी चार...'

पत्रकार परिषदेनंतर कारखान्याच्या कर्मचार्‍यांचं संरक्षण करावं, या मागणीचं निवेदन संचालक मंडळाच्या व कर्मचाऱ्यांच्या वतीनं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आलं. कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना आमदार सतेज पाटील समर्थक संदीप नेजदार आणि त्यांच्या गुंडांनी मंगळवारी बेदम मारहाण केली. शिवाय साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून, राजाराम कारखान्याच्या ऊस तोडणी पाळीपत्रकावर काल आमदार सतेज पाटील यांनी आरोप केले होते.

छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक (Amal Mahadik) आणि संचालकांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन, सतेज पाटील यांना प्रत्युत्तर दिलं. सतेज पाटील यांनी संदीप नेजदार यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन, राजाराम कारखान्याचे एमडी प्रकाश चिटणीस यांच्यावर हल्ला घडवून आणला असल्याचा आरोप यावेळी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सतेज पाटील (Satej Patil) यांनी ऊसतोडणी पाळीपत्रकावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. संदीप नेजदार यांचा 178 टन ऊस आतापर्यंत कारखान्याला गेलाय. त्याचं बिलसुध्दा नेजदार यांच्या बँक खात्यावर जमा झालंय. डी. वाय. पाटील यांचा 20 टन, संजय डी. पाटील यांचा 56 टन, सतेज पाटील यांचा 10 टन ऊस आतापर्यंत राजाराम कारखान्यानं गाळप केला. सतेज पाटील यांच्या मोर्चात सहभागी असणार्‍या प्रशांत नायकू पाटील, सुनंदा हरीष चौगुले, प्रताप घाटगे, मिलिंद बाळकृष्ण पाटील, प्रदीप घाटगे, अमरसिंह पाटील यांच्यासह अन्य शेतकर्‍यांच्या उसाची तोडणी केल्याची यादीच महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कसबा बावड्यातील 807 शेतकर्‍यांच्या नोंदी झाल्या असून, त्यापैकी 422 शेतकर्‍यांच्या उसाला तोडणी दिली. त्याशिवाय 200 बिगर सभासदांचा ऊस कारखान्याला आला. यावर्षी ऊस गळीत हंगाम 15 दिवस उशिरा सुरु झाला. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत आजपर्यंत कसबा बावड्यातील 1 हजार टन उसाचं जादा गाळप झाल्याचं अमल महाडिक यांनी सांगितलं.

राजाराम कारखान्याची ऊस नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळं नोंदणी करुन घेतली नाही, हा दावा सपशेल खोटा आहे. खोटं बोल पण रेटून बोल, ही सतेज पाटील यांची जुनीच पध्दत आहे. शेतकर्‍यांच्या आडून राजाराम कारखान्याला बदनाम करण्याचा आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न सतेज पाटील करत आहेत, असा घणाघाती आरोप माजी आमदार अमल महाडिक यांनी केला.

या प्रकरणाची पोलीस प्रशासनानं गंभीर दखल घेऊन, कर्मचार्‍यांमधील असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी योग्य कारवाई करावी, अशी मागणी अमल महाडिक यांनी केली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नारायण चव्हाण, सत्यजित कदम संचालक दिलीप पाटील, तानाजी पाटील, मारुती किडगावकर, शिवाजी पाटील, दिलीप उलपे, विलास जाधव, संतोष पाटील, संजय मगदूम, सर्जेराव पाटील, नंदकुमार भोपळे उपस्थित होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Satej Patil, Amal Mahadik
Malanggad News : मलंगगडच्या रिंगणाला वादाची किनार; आव्हाडांच्या मुख्यमंत्र्यांवरील ट्विटला म्हस्केंचं प्रत्युत्तर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com