NCP Ajit Pawar Group : अजितदादांच्या प्रवक्त्यांना नोटीस, नक्की काय आहे प्रकरण !

Notice to the Spokespersons : अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर गेल्या काही दिवसांपासून रोखठोक भूमिका घेत महायुतीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडण्यास सुरूवात केली आहे.
Sunil Tatkare, Ajit Pawar
Sunil Tatkare, Ajit PawarSarkarnama

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाच्या प्रवक्त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी या नोटीस बजाविली असून महायुतीवर बोलताना वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच त्यावर बोलण्याची ताकीद या प्रवक्त्यांना देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर महायुतीत सहभागी असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर त्याचे जोरदार पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. महायुतीत सहभागी असलेल्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी या अपयशाचे खापर एकमेकांवर फोडत असल्याचे चित्र आहे.

Sunil Tatkare, Ajit Pawar
Amol Mitkari Vs Praveen Darekar : 'भाजपच्या काही वाचाळवीरांनी शांत बसावं, अन्यथा...'; मिटकरी अन् दरेकरांमधला वाद टोकाला

गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक खटके उडत आहेत. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींनी महायुतीमधील राजकारण चांगलेच तापले आहे. महायुतीत सहभागी असलेल्या भाजप, अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी, प्रवक्ते एकमेकांवर आरोप करत तोंडसुख घेत आहेत. अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर गेल्या काही दिवसांपासून रोखठोक भूमिका घेत महायुतीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडण्यास सुरूवात केली आहे.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पुरेशा जागा न मिळाल्यास प्रसंगी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले होते. त्यावरून भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मिटकरी यांना कडक शब्दात सुनावले आहे. जागा वाटपाचे अधिकार मिटकरी यांना देण्यात आले आहेत का ? अशा शब्दात दरेकर यांनी मिटकरींवर टीका केली. त्यावर मिटकरी यांनीही भाजपच्या काही वाचाळवीरांनी शांत बसावे, असे सुनावले आहे. हा वाद येणाऱ्या काळात अधिकच वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Sunil Tatkare, Ajit Pawar
Ajit Pawar Vs BJP : अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा; फडणवीसांचे निकटवर्तीय भाजप पदाधिकाऱ्याचा हल्लाबोल

महायुतीमधील नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येत असल्याने आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यामध्ये हस्तक्षेप केला आहे. तटकरे यांनी पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस दिली आहे. महायुतीबाबत बोलताना पक्ष नेतृत्वाची मान्यता घेऊन मगच बोलावे, असे सांगण्यात आले आहे. महायुतीमधील वाद टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com