Ajit Pawar Vs BJP : अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा; फडणवीसांचे निकटवर्तीय भाजप पदाधिकाऱ्याचा हल्लाबोल

Sudarshan Chaudhary's Attack : आता पुणे जिल्ह्यातील भाजपचे काही पदाधिकारी अजित पवार यांना महायुतीमधून बाहेर काढण्याची भाषा बैठकांमध्ये करू लागले आहेत.
Sudarshan Chaudhary-Ajit Pawar
Sudarshan Chaudhary-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 27 June : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. लोकसभेच्या 48 जागांपैकी अवघ्या 17 जागांवर महायुतीला समाधान मानावे लागले. या खराब कामगिरीनंतर विविध पातळ्यांवर पराभवाची समीक्षा करण्यात येत आहे. अजित पवार यांना सोबत घेतल्याने महायुतीला निवडणुकीत फटका बसला, अशी चर्चा भाजप वर्तुळात दबक्या आवाजात सुरू होती. पण, आता पुणे जिल्ह्यातील भाजपचे काही पदाधिकारी अजित पवार यांना महायुतीमधून बाहेर काढण्याची भाषा बैठकांमध्ये करू लागले आहेत. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरी भेट दिलेल्या या पदाधिकाऱ्यानेच ही मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकामध्ये लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखामध्ये भाजपने (BJP) अजित पवारांना (Ajit Pawar) सोबत घेऊन स्वतःची ‘ब्रँड व्हॅल्यू’ कमी केल्याचं लिहिलं होतं. यावरून आता महायुतीमध्ये (Mahayuti) वादाची ठिणगी पडली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला जबरदस्त धक्का दिला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला तब्बल 31 जागा मिळाल्या आहेत, तर महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या निवडणुकीतील पराभवाचं विविध पक्ष तसेच तज्ञ वेगवेगळ्या अंगाने विश्लेषण करत आहेत. असाच एक विश्लेषणपर लेख ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकमध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे. या लेखामध्ये अजित पवार यांना भाजपनं सोबत घेतलं, या रणनीतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजला बसल्याचं अप्रत्यक्षरित्या म्हटलं आहे.

संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रानंतर आता भाजपच्या संघटनेतूनही अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा, अशी मागणी होऊ लागली आहे. भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये आपली खदखद बोलून दाखवली.

Sudarshan Chaudhary-Ajit Pawar
Video Anil Parab : अनिल परब लेट आले, पण थेट ठाकरे, दानवेंच्या शेजारी बसले!

अजित पवार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी नको, अशी भावना या भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले सुदर्शन चौधरी?

कार्यकर्त्यांचं ऐकणार असाल तर एक काम करा. अजित पवारांनाच महायुतीतून बाहेर काढा. त्यांनी सुभाषबापू, राहुल कुल यांच्यावर अन्याय केला आहे. हे सर्व जण आज मंत्री झाले असते, त्यांना महामंडळ मिळाली असती. मात्र, अजित पवार आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. डीपीटीसीचा निधी मिळायलाही कार्यकर्त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे एक वेळ सत्ता नको; पण अजित पवारांना सोबत घेऊ नका, अशी मागणी सुदर्शन चौधरी यांनी केली.

Sudarshan Chaudhary-Ajit Pawar
Ram Satpute : सोलापुरात हरुनही नवा कॉन्फिडन्स घेऊन राम सातपुते विधान भवनात!

ते म्हणाले, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची सारखीच परिस्थिती आहे. स्वाभिमानी नेतृत्व पुणे जिल्ह्याला मिळत नाही, लोकांचे हाल झाले आहेत. गेली दहा वर्ष आम्ही त्यांच्याशी दोन हात करत आहोत. मात्र, आता त्यांच्यासोबतच हातमिळवणी करण्यात आली आहे. त्यांना कशासाठी सोबत घेण्यात आलं आहे.

भाजपच्या बूथ स्तरापासून जिल्हा पातळीवरच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, अजित पवार सोबत नको आहेत. आम्ही काय अजितदादांसाठी सत्ता आणायची काय. पालकमंत्री होऊन त्यांनी बॉस व्हायचं आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रडायचे असे होत असेल तर आम्हाला सत्ता नको. आमच्या लोकांना आमदार होऊद्या, त्यांनी पक्ष वाढवलं आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळं दिलं आहे, असेही चौधरी यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com