Ajit Pawar : मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणाबाबत अजितदादा म्हणाले, "काही जणांची भाषणं.."

Ajit Pawar : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर टीका करताना राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama

पुणे : राज्याच्या इतिहासात बुधवारी प्रथमच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे (Dasara Melava) झाले. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भाषणाबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. दोघांनीही एकमेकांवर टीका केली. यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या भाषणांबाबत खोचक टीका केली आहे.

अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. ते माध्यमांशी बोलत होते. या दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी शिंदे गटाला प्रत्युत्तर दिले आहे. "काही जणांची भाषणं अनावश्यक लांबली.." असा टोमणा शिंदे यांचे नाव न घेता अजित पवारांनी लगावला.

शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी जवळपास अर्धा तास भाषण केले. तर बीकेसीच्या मैदानावर शिंदे यांनी जवळपास दीड तास भाषण केले.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ठाकरे यांच्यावर काही गंभीर आरोप केले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर टीका करताना राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.

Ajit Pawar News
Shinde vs Thackeray : ठाकरेंच्या मेळाव्यात या दोन नेत्यांचे भाषण ठरलं हिट, शिंदे, राणेंवर 'प्रहार'

"शिंदे यांच्या आरोपात काही अर्थ नाही. आम्हाला अनेक वर्ष वेगवेगळे पक्षाला घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. जे वक्तव्य केलंय, ते राजकीय हेतूने असल्याचा पलटवार अजित पवारांनी केला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे नाव घेण्याचे टाळले. पण काहींची भाषणं नको इतकी लांबली. कोणाची ते तुम्ही ठरवा, असे अजित पवार यांनी म्हटले.

ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादीकडे गहाण ठेवली, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिमोटवर शिवसेना चालत होती, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात केला होता.

अजित पवार म्हणाले, "मी दोघांची भाषणं ऐकली. पहिले उद्धव ठाकरे यांचे झाले आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंचं झाले. दोघांनी काय भाषणं केली हे सर्वांनी पाहिलं. यावर आम्ही जास्त टीका-टीपणी करण्याची गरज नाही. आम्ही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम केलं. त्यांचे विचार होते. आणि ठाकरे मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदेंसोबतही काम करत होते,"

"आता महाराष्ट्रातील मतदारांनी आणि शिवसैनिकांनी निर्णय घ्यायचा आहे.कोणाच्या पाठिशी उभे राहायचं ? मूळ शिवसेना पक्ष कोणाचा आहे ?, याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे. ते आमच्या मंत्रिमंडळात होते, तेव्हा माझ्या उजव्या बाजूलाच बसायचे. पण तेव्हा झेंडा आमचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा ही भावना त्यांनी कधी बोलून दाखवली नाही," असे अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com