Loksabha Election 2024 : जितेंद्र आव्हाड वाटेल ते बोलतात; राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीकेची झोड

Mahayuti Politics : राज्यातील राजकीय अनुकूल स्थिती पाहता महायुतीचे 45 प्लस उमेदवार विजयी होतीलच, तसेच ठाणे जिल्ह्यातील लोकसभेचे तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी व्यक्त केला
Anand Paranjpe, Jitendra Awhad
Anand Paranjpe, Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Thane Political News :

डॉ. जितेंद्र आव्हाड त्यांच्यावर विनयभंगाच्या केसेस, अपहरणाच्या केसेस, 307 ची केस आहे. असे असतानाही ते कुठल्या नैतिकतेचे उपदेश देत आहेत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. आव्हाडांना भीती वाटत आहे की, त्यांच्या बाजूने जे कोण थोडेफार उरले आहेत त्यांचाही ओढा आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने आहे. यामुळेच आव्हाड वाटेल ते बोलत सुटले आहेत, असा आरोप आनंद परांजपे यांनी केला.

Anand Paranjpe, Jitendra Awhad
Eknath Shinde : राज्याचा कारभार हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे ठाणे पैशांअभावी अस्वस्थ!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे भर अधिवेशनात धिंडवडे काढले आणि ते उभ्या महाराष्ट्रानेही पाहिले आहे. अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. आम्हाला पक्षाचे नाव, चिन्ह, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहे. राज्यातील स्थिती पाहता महायुतीचे 45 प्लस उमेदवार विजयी होतीलच, शिवाय ठाणे जिल्ह्यातील लोकसभेचे तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वासही राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे तसेच पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी व्यक्त केला.

या वेळी परांजपे यांनी आव्हाडांवर जोरदार टीका केली. आव्हाड रात्रीचा काय पदार्थ खातात माहीत नाही. पण त्यानुसार ते बोलत असतात. खरेतर आव्हाडांना भीती वाटते की जे थोडेसे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी त्यांच्या बाजूने उरले आहेत त्यांचाही ओढा अजित पवार यांच्या दिशेने सुरू झालेला आहे. बीडमधून 20 नगरसेवक अजित पवारांसोबत येत आहेत. अशीच स्थिती राहिल्यास त्यांचा उरलेला पक्ष टिकेल की नाही, ही भीती आव्हाडांना सतावत आहे. यामुळे फार महत्त्व आव्हाड यांच्या राजकीय मतांना देऊ नये, असे आवाहन परांजपे यांनी केले. तसेच कळवा विधानसभा मतदारसंघातील मतदारही आव्हाडांना गांभीर्याने घेत नसल्याचाही दावा परांजपे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे केंद्रीय शीर्ष नेतृत्व, शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महायुतीचे नेते चर्चेला एकत्र बसतील तेव्हा महायुतीचा फॉर्म्युला जाहीर होईल. खेळीमेळीच्या वातावरणात लोकसभा निवडणुकीसाठीचे (Loksabha Election) जागावाटप होईल आणि महायुतीचे 45 प्लस उमेदवार विजयी होतील, असा दावा परांजपे यांनी केला.

(Edited by Avinash Chandane)

R

Anand Paranjpe, Jitendra Awhad
NCP Political War : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही बँक खात्यावरून संघर्ष; 'या' पक्षाचे बँकेला पत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com