NCP Political War : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही बँक खात्यावरून संघर्ष; 'या' पक्षाचे बँकेला पत्र

Ajit Pawar Vs Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्याचे मान्य केले, तर शरद पवार यांच्या गटाला निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी मान्यता दिली आहे. पण त्यांच्यात आता बँकेतील निधीवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News :

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू असताना शिवसेनेने ठाकरे गटाविरुद्ध तक्रार केली आहे. शिवसेनेचा निधी ठाकरे गटाने वापरल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी आणखी एक वाद समोर आला आहे. राष्ट्रवाजी काँग्रेसने थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर राजकीय वार केला आहे. राष्ट्रवादीच्या बँकेतील पक्षाच्या निधीवरून दोन्ही पक्ष आमने-सामने आले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) त्यांचे खाते असलेल्या बँकेला पत्र पाठवले आहे, अशी माहिती मिळते. या पत्रामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
Sharad Pawar : बारामतीकरांची झलक! महायुतीच्या कार्यक्रमात पवार उभे राहताच शिट्ट्या, घोषणा अन् टाळ्यांचा कडकडाट...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) थेट बँकेला पत्र पाठवले आहे. त्यात आपल्या परवानगीशिवाय बँकेच्या खात्यातून कोणतेही आर्थिक व्यवहार केले जाऊ नयेत, अशी मागणी केल्याची माहिती मिळते. केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना (Shivsena) पक्ष म्हणून मान्यता दिली होती तेव्हा ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) यांनी शिवसेना पक्षाच्या बँक खात्यातून 50 कोटी रुपये काढून घेतल्याची चर्चा आहे. तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बँक खात्याबाबत घडू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने बँकेला पत्र पाठवून शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बँक खात्याशी संबंधित कोणतेही व्यवहार करून देऊ नयेत, यासाठी बँकेला पत्र पाठवल्याचे समजते. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे दिला. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाला निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCP Sharadchandra Pawar) अशी मान्यता दिली. असे असले तरी बँक खाते एकच आहे. आणि यावरून सध्या शिवसेना आणि ठाकरे गटात संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बँकेतून पैसे काढण्याचे कुठलेही पाऊल उचलू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय खेळी करत थेट बँकेला पत्र लिहून त्यांच्या परवानगीशिवाय आर्थिक व्यवहार होऊ देऊ नयेत, अशी मागणी केली आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar: अमोल कोल्हेंच्या होमपीचवर आज अजितदादांची तोफ धडाडणार; 'हे' मुद्दे केंद्रस्थानी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com