Jitendra Awhad, Ajit Pawar
Jitendra Awhad, Ajit PawarSarkarnama

NCP Crisis News : "ठाण्याच्या पठ्ठ्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचं पार वाटोळं झालं"; अजित पवारांनी आव्हाडांवर हल्लाबोल

Ajit Pawar On Jitendra Awhad : शरद पवारांच्या राजकारणाच्या पद्धतीवरही अजितदादांनी ठेवले बोट
Published on

Maharashtra NCP Crisis News : राष्ट्रवादी काँग्रेस काही जणांनी वाट लावायची ठरवले आहे. त्यांच्यामुळे राष्ट्रवादीचे काही कर्तृत्वान लोक सोडून गेले. उदाहण द्यायचे झाले तर आपला हा ठाण्याचा पठ्ठ्या, असे म्हणत अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जहरी टीका केली. (Latest Political News)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर बुधवारी (ता. ५) त्यांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी शरद पवार यांच्यासह त्यांच्या गटातील नेत्यांवर सडकून टीका केली. शरद पवार यांच्या राजकारणावरही बोट ठेवले.

Jitendra Awhad, Ajit Pawar
Maharashtra Political Crisis: पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट? कोण कुठल्या मेळाव्याला उपस्थित होतं?

यावेळी अजित पवार यांनी माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यार जोरदार हल्लाबोल केला. आव्हाड यांच्यामुळे पक्ष बुडण्याची वेळ आली. तरी पवारसाहेब त्यांना जवळ करतात, अशी जहरी टीका पवार यांनी आव्हाड यांच्यावर केली. अजित पवार म्हणाले, साहेबांनी पक्षात असे काही लोक बरोबर घेतले आहेत की ते संघटनेचे वाटोळे करतील. उदाहरण द्यायचे झाले तो ठाण्याचा पठ्ठ्या. त्यांच्यामुळे गणेश नाईक आपला पक्ष सोडून गेले. संदिप नाईक, सुभाष भोईर, किसन कथोरे, निरंजन डावखरे हे पक्ष सोडून गेले. ज्येष्ठ वसंतराव डावखरे म्हणत होते की दादा साहेब यांना का मोठे करतात."

Jitendra Awhad, Ajit Pawar
Uddhav Thackeray News : राष्ट्रवादीत फूट; उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा : 48 जागांवर तयारी करण्याच्या सूचना

शरद पवार यांचे राजकारण सर्व राज्याने पाहिले असे म्हणत अजितदादांनी सर्व इतिहासच सांगितला. अजित पवार म्हणाले, "राज्यात पुलोद सरकार स्थापन करून उलथापालथ केली. त्यानंतर सोनिया गांधींचा परदेशीचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि पुन्हा काँग्रेसची साथ दिली. २००४ मध्ये मुख्यमंत्री पदाची संधी दवडली. २०१४ मध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. २०१७ मध्ये शिवसेनेला विरोध करून सत्तेत जाण्यास नकार दिला. त्यानंतर २०१९ मध्ये मात्र शिवसेनेला जवळ केले."

Edited by Sunil Dhumal

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com