Uddhav Thackeray News : राष्ट्रवादीत फूट; उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा : 48 जागांवर तयारी करण्याच्या सूचना

Shivsena News : उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागांवर तयारीला लागा, अशा सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेते, पदाधिकाऱ्यांना केल्या.

उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. मंगळवारी नेते, उपनेते, आमदारांच्या बैठकीनंतर बुधवारी माजी आमदारांबरोबर उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थितीचा आढावा घेतानाच पक्षवाढीची चर्चा करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray News
Sharad Pawar News : शरद पवारांच्या बैठकीला कोणते आमदार अन् खासदार उपस्थित? पाहा संपूर्ण यादी

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी शिवसेना (Shivsena) नेत्यांना निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) आपल्याला संधी आणि वाव आहे. त्यामुळे जागा मिळणार की नाही याची चिंता करु नका. सर्व ४८ जागांवर तयारीला लागा. कुठली जागा कुणाला मिळणार याचा विचार तुम्ही करू नका.

Uddhav Thackeray News
Shiv Sena News : 'शिवसेनेचे बंडखोर ठाकरेंकडे परत जातील'; भाजपा खासदाराच्या दाव्याने पुन्हा खळबळ

त्याची चिंता माझ्यावर सोडा, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या सहकाऱ्यांना आश्वस्त केले. दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पक्षसंघटनेवर लक्ष केंद्रित केले. विविध शहरांतील पक्षसंघटनेला ताकद देण्यासाठी स्वतः ठाकरेही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com