Baramati Loksabha : अजितदादांच्या बारामती लढविण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना सुळेंचे सूचक विधान; ‘माझ्या पोटात खूप गोष्टी...’

Supriya Sule News : सगळ्याच गोष्टी मी काही बोलत नाही. माझ्यावर संस्कार झाले आहेत.
Supriya Sule-Ajit Pawar
Supriya Sule-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. सगळ्याच गोष्टी मी काही बोलत नाही. माझ्यावर संस्कार झाले आहेत. आपलं कुटुंब, आपला पक्ष आणि नाती आपल्याला जपायची असतात, त्यामुळे सगळ्याच गोष्टी महिला बाहेर बोलत नसतात, असा इशारा देत अजित पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या घोषणेचे मी स्वागत करते, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. (Supriya Sule welcomed Ajit Pawar group's decision to contest Baramati Lok Sabha)

कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती, रायगड, सातारा आणि शिरूर मतदारसंघांतून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. त्यावर खासदार सुळे बोलत होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule-Ajit Pawar
Ajit Pawar Vs Jayant Patil : सोळंकेंना कार्याध्यक्षपदाचा शब्द मी नव्हे, अजितदादांनी दिला होता; जयंत पाटलांचा पलटवार

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी आहे, त्यामुळे एखाद्या पक्षाला कुठून लढायचं आहे, ते ठरविण्याचा अधिकार त्या पक्षाला आहे. कुठून लढायचं आहे, त्यांच्या महायुतीचा प्रश्न आहे. अजित पवार यांच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करते. आमची नाती एका जागेवर आहेत आणि राजकारण वेगळ्या जागेवर आहे. नाती आणि राजकारण यामध्ये गल्लत करायची नसते. लोकशाहीमध्ये कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच ना. त्यात गैर काय?

कुटुंबातील व्यक्ती उमेदवार आली तरी ती एक लोकशाही आहे. त्यात गैर काय आहे. ही लढाई वगैरे मी मानत नाही. लोकांची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आली आहे. लोकसेवा हा विषय असेल तर लढाई वगैरे काही नसते, असेही त्यांनी नमूद केले.

देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीला मला कोणी बोलावलं नव्हतं. मी स्वतःहून गेले हाेते. मी त्यांना विनंती केली होती की, तुमचा प्रस्ताव मला द्या. मी शरद पवार यांच्याशी बोलते. त्यासाठी मला सात दिवसांची मुदत द्या. आज ते जे काही बोलत आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. तो त्यांचा अनुभव सांगत आहेत. त्यात गैर काय आहे, असा सवाल त्यांनी केला.

Supriya Sule-Ajit Pawar
NCP Karjat Shibir : प्रकाश सोळंकेंना राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाचा शब्द दिला होता; अजित पवारांचा गौप्यस्फोट

त्या म्हणाल्या की, अजित पवार हे त्यांच्या मनातील बोलत आहेत. तो त्यांना अधिकार आहे. पण, बऱ्याच गोष्टी आहेत, पण माझ्या आईने माझ्यावर असे संस्कार केले आहेत की, सुप्रिया सगळ्याच गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. त्यामुळे मी ना पुस्तक लिहिणार आहे ना त्या विषयावर मी बोलणार आहे. माझी लढाई ही वैचारिक लढाई असून, ती भाजपशी आहे.

कुणी काही बोलत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. अजित पवार यांनाही मन मोकळं करण्याचा अधिकार आहे. ते करत असतील त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मी कशाला उत्तरं देऊ, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

Supriya Sule-Ajit Pawar
Azra Sugar Factory Election : मुश्रीफ-बंटी पाटलांचा दोस्ताना तुटणार; ‘आजरा’ची निवडणूक लढविण्याची राष्ट्रवादीची घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com