Rashtrawadi Crisis: 'सरकारनामा` चे वृत्त ठरले, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दादांच्या बैठकीला..

Pimpri-Chinchwad NCP Activists Support Ajit Pawar : शरद पवारसाहेब हे आमचे दैवत असल्याचे गव्हाणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
Political Twist In Maharashtra
Political Twist In Maharashtra Sarkarnama
Published on
Updated on

Todays Rashtrawadi Meeting: राष्ट्रवादी कॉंग्रेस रविवारी (ता.२) दुभंगली. त्यानंतर कोणता झेंडा घेऊ हाती (साहेब की दादा) असे सॅंडविच पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राज्यभर झालेले आहे. मात्र,अजितदादांच्या आवडत्या पिंपरी-चिंचवडने त्यांना साथ देण्याचा एकमुखी निर्णय काल (ता.४) घेतला अन् आज ते मुंबईतील बैठकीला उपस्थित आहेत. (Political Twist In Maharashtra)

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पिंपरी-चिंचवडमधील बहूतांश पक्ष पदाधिकार्यांचा कल अजितदादांकडेच` या हेडिगखाली दोन दिवसंपूर्वीच `सरकारनामा`ने बातमी दिली होती. ती खरी ठरली. अजितदादा यांच्यापाठी राहण्याचा निर्णय पक्षाच्या शहर बैठकीत काल घेण्यात आला,अशी माहिती शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी `सरकारनामा`ला दिली.

Political Twist In Maharashtra
NCP Meeting : 'आर. आर. पाटलांनी भाजपला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अद्यापही बाकी आहे..' ; दहा वर्षांपूर्वीचा Video होतोय व्हायरल

पक्षाच्या (अजित पवार गट) आज मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी ते सकाळी चारशे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शंभर मोटारीतून रवानाही झाले आहेत. त्यात गव्हाणे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट,कार्याध्यक्ष फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप,माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे,ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक शाम लांडे,मोरश्वर भोंडवे,राहूल भोसले तसेच विशाल वाकडकर, यश साने, कविता खराडे, गंगा धेंडे आदींचा समावेश आहे.

शरद पवारसाहेब हे आमचे दैवत असल्याचे गव्हाणे यांनी यावेळी स्पष्ट केले. शहराचा विकास अजितदादांमुळेच झाला असून विकासाच्या मुद्यावरच ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले असल्याने उद्योगनगरीच्या विकासाला आणखी गती मिळे, असे ते म्हणाले.

Political Twist In Maharashtra
NCP Crisis News Live: अजितदादांनी फडकवला राष्ट्रवादीचा झेंडा; बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांची संख्या आली समोर.

पिंपरी-चिंचवडमधील पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोड़े यांनी अजितदादांच्या दुसऱ्या बंडातही त्यांना साथ दिली. रविवारच्या (ता.२) त्यांच्या या बंडानंतर त्याच दिवशी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे नाना काटेंनी प्रथम जाहीरपणे आपण अजितदादांच्या मागे असल्याचे जाहीर केले आहे. तेव्हाच शहराचा कल दिसून आला होता. त्यानंतर शहरातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही अंदाज शहराध्यक्षांनी तो काल शहर कार्यकारिणीची बैठक घेऊन जाणून घेतला. त्यात अजितदादांना एकमुखी पाठिंबा देण्याचे ठरले,असे गव्हाणे म्हणाले.

शहर राष्ट्रवादीत बहूतांश जणांना पदे ही अजितदादांनी दिलेली होती व आहेत. पिंपरी महापालिकेत सत्तेत असताना अनेकांना त्यांच्यामुळेच पदाधिकारी होता आले. सत्तेची चव चाखता आली आहे. त्यामुळे ते दादांच्या पाठीशी राहणार यात शंका नव्हती. फक्त पक्ष म्हणून दादांबरोबर जाणार यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.ते काल झाले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com