Sakal-Saam Survey On NCP : अजित पवार गटाचे धाबे दणाणले; काय सांगतो 'सकाळ-साम' सर्व्हे ?

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यातील लोकांना काय वाटते ?
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

NCP Crisis And Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर राज्याच्या राजकीय घडामोंडींना अनपेक्षितपणे मोठे वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर 'सकाळ-साम'ने राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीबाबत सर्वेक्षण केले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार आणि शरद पवार यापैकी कोणत्या गटाला लोकांचा पाठिंबा आहे, याचाही कल जाणून घेतला आहे. (Latest Political News)

'सकाळ-साम'ने केलेल्या सर्वेक्षणात ७४ हजार ३३० मतदारांची भूमिका जाणून घेतली आहे. यात विविध पक्षांना मतदान करणाऱ्या सर्व वयोगटातील मतदारांचा सहभाग आहे. तसेच ५० टक्के महिलांसह सर्व जाती-धर्मांच्या लोकांचाही समावेश केला आहे. यासह विविध व्यवसाय, नोकरी करणाऱ्या आणि आर्थिक स्थितीचाही विचार करण्यात आला आहे. या सर्वेक्षणासाठी 'सकाळ' संस्थेतील कर्मचाऱ्यांनी फिल्डवर जाऊन लोकांकडून राज्यातील राजकीय स्थितीबाबत उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली आहेत.

Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Ajit Pawar News : अजित पवार बँकेला वाचविणार की बँक बुडवणाऱ्यांना?

दरम्यान, अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील राज्यातील अनेक नेत्यांनी समर्थन केले आहे. मात्र राज्यातील लोकांचा पाठिंबा शरद पवार यांना असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या सर्वेक्षणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडात आपल्याला कुणाची बाजू योग्य वाटते, असा प्रश्न मतदारांना विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना सहभागी ४३.६ टक्के मतदरांना शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर अजित पवार यांना २३.१ टक्के तर ३३.३ टक्के मतदारांनी सांगता येत नाही असे सांगितले आहे. मतदारांच्या या उत्तरांवरून शरद पवार यांना मतदारांचा मोठा वर्ग असल्याचे दिसून येत आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
NCP Bhandara News : प्रफुल्ल पटेलांचे खास असलेल्या फुंडेंना आमदारकीची लॉटरी लागणार?

या प्रश्नावर विविध पक्षांच्या मतदारांचाही कल जाणून घेतला आहे. शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६१, भाजपच्या १९, काँग्रेसच्या ५७ तर शिवसेनेच्या ५४ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. अजित पवार यांना राष्ट्रावादी काँग्रेसच्या २५, भाजपच्या ४१, काँग्रेसच्या १४ तर शिवसेनेच्या १५ टक्के मतदारांचा पाठिंबा आहे. तर या दोन्ही गटांबाबत राष्ट्रवादीच्या १४, भाजपच्या ४०, काँग्रेसच्या ३० आणि शिवसेनेच्या ३१ टक्के मतदारांनी सांगता येत नाही असे उत्तर दिले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com