Eknath Khadse : खडसेंचा मोठा गौप्यस्फोट ; गिरीश महाजन चावट, महाजनांची एक क्लिप माझ्याकडे..

Eknath Khadse : . या व्हिडिओची क्लिप गिरीश महाजन यांनीच व्हायरल केली असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.
Eknath Khadse,  Girish Mahajan
Eknath Khadse, Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि यांच्यात कलगीतुरा रंगताना दिसत आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत जेव्हापासून प्रवेश केलाय तेव्हापासून खडसे-महाजन यांच्यात वारंवार वादविवाद होत आहेत. अशातच आता खडसेंनी महाजन यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे.

जळगाव येथील एका कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन बंजारा समाज आक्रमक झाला आहे. खडसेंच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रविवारी आंदोलन करण्यात आले.

काही ठिकाणी खडसे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. याप्रकरणी मुक्ताईनगर येथीस बंजारा समाज मात्र खडसे यांच्या पाठिशी ठामपण उभा आहे.

"निवडणुकीत बंजारा समाजाला दोन किलो मटन आणि एक बाटलीत दिली की बस, हे मी पाहिलं आहे," असे खडसे म्हणाले होते. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची क्लिप गिरीश महाजन यांनीच व्हायरल केली असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.

Eknath Khadse,  Girish Mahajan
Sanjay Raut : राहुल गांधींचा राऊतांना फोन, राऊतांनी स्पष्टचं सांगितलं, "..ओलावा संपला.."

बंजारा समाजाच्या आंदोलनानंतर खडसे यांनी त्यांचे शब्द मागे घेतले असून दिलगिरी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसेंनी या प्रकरणावरुन भाजप नेते गिरीश महाजनांवर निशाणा साधला आहे.

महाजन यांची एक क्लिप आपल्याकडे असल्याचं खडसे यांनी एका कार्यक्रमात सांगितलं आहे. महाजन चावट असल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे. खडसेंकडे गिरीश महाजन यांची कुठली क्लिप आहे, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com