Dhananjay Munde News: धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; करुणा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मोठी मागणी

Karuna Munde On Dhananjay Munde : चाकणकरांना आयोगाच्या अध्यक्षपदावरुन हटवा नाहीतर ...
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Karuna Munde Criticize On Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला काही दिवसांपूर्वीच अपघातातून बचावले होते. या अपघातातून सावरल्यानंतर पुन्हा एकदा मुंडे हे राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे(Nana Kate) यांच्या प्रचारात सहभागही घेतला होता. मात्र याचदरम्यान, आता त्यांची पत्नी करुणा मुंडे यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे कारवाईची मागणी केली आहे.

करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. या पत्रात केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसेच करुणा मुंडे यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे.

Dhananjay Munde
Sudhir Mungantiwar News: ...अन्यथा ही एक फॅशन होऊन जाईल, असं का म्हणाले सुधीर मुनगंटीवार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटल्यानंतर माझे बनावट व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोपही करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. याचवेळी आता रोज मला धमक्या दिल्या जात आहे. मानसिक त्रास दिला जातोय. त्यामुळे मी माझ्या स्वखर्चाने धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करण्याची विनंती करत आहे. धनंजय मुंडे आणि मी किती खरी आणि किती खोटे आहोत, याचे दूध का दूध आणि पानी का पानी होईल असंही मुंडे म्हणाल्या आहेत.

धनंजय मुंडे यांनी आजपर्यंत मला फसवण्यासाठी किती प्रयत्न केले. पोलिसांसमोर गाडीत रिव्हाॅल्वहर ठेवले. मला माझ्या मुलांपासून सहा महिने दूरही ठेवले. माझ्यावरती जीवघेणे हल्ले झाले, सहा खोट्या केसेस केल्या. षडयंत्र रचण्यासाठी वेगवेगळे लोक पाठवून माझी आर्थिक फसवणूक केली. तरीही मी हरली नाही, माझी त्यांच्यासोबतची लढाई अद्यापही सुरूच आहे असंही मुंडे (Karuna Munde) यांनी पत्रात लिहिलं आहे.

Dhananjay Munde
Dhule News; महापौरांचा संताप....80 लाख खर्च तरीही शहरात कचरा कसा?

चाकणकरांना आयोगाच्या अध्यक्षपदावरुन हटवा नाहीतर ...

धनंजय मुंडेंची तक्रार देऊनही महिला आयोगाने कारवाई न केल्याने रुपाली चाकणकरांची अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणीही राष्ट्रीय महिला आयोगाकडे करणार असल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलं आहे. तसेच धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल न झाल्यास आणि रुपाली चाकणकरांना काढून न टाकल्यास मंत्रालयासमोर उपोषणाला बसू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

"मी ज्या ज्या मुलींचे नावे सांगेन त्या त्या मुलींसोबत धनंजय मुंडे यांचे काय संबंध आहेत. त्याचा पण पर्दाफाश होईल. या सगळ्या गोष्टींची तक्रार मी DGP, मुख्यमंत्री आणि महिला आयोगाकडे केली आहे. मात्र, आतापर्यंत त्यावर काहीच कारवाई झाली नाही असंही करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com