Sudhir Mungantiwar News: ...अन्यथा ही एक फॅशन होऊन जाईल, असं का म्हणाले सुधीर मुनगंटीवार !

Sanjay Raut : राजा ठाकूर नामक गुंडाला सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : अशोक चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीबद्दल पोलिसांनी चौकशी करावी. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तपासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. पुढे अशा प्रकरणाच्या तपासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

नागपुरात आले असता मंत्री मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी मला ठार मारण्यासाठी राजा ठाकूर नामक गुंडाला सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात ते म्हणाले, हे प्रकरण गंभीर आहे की नाही, हे पोलिसांनी तपासलं पाहिजे.

प्रकरणामध्ये सत्यता आहे की नाही, याचा तपास झाला पाहिजे. आरोपाचा सोर्स काय आहे, आरोपा करण्यामागे तर्क काय आहे, हे न सांगता जर आरोप केले, तर भविष्यात एखादा खरा आरोपही असेल तर तोसुद्धा या प्रकरणामुळे लोकांना कधीच खरा वाटणार नाही आणि उठसूठ आरोप करण्याची फॅशनच सुरू होईल.

आपण आरोप करायचा आणि मात्र आरोपासंदर्भात माहितीचा स्त्रोत सांगायचाच नाही. असं कसं चालेल? संजय राऊत यांच्याकडे जी माहिती असेल, ती पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावून घेतली पाहिजे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विचारले असता, मंत्रिमंडळ विस्तार योग्य वेळी होईल.

अडीच वर्ष आम्ही सत्तेत नव्हतो. आम्ही कोणीही मंत्री नव्हतो. तेव्हाही राज्याचे प्रश्न घेऊन आम्ही लढत होतो. लोकांचे प्रश्न सोडवत होतो. आता मंत्रिमंडळाचा विस्तार काही कारणामुळे थांबला होता. योग्य वेळी विस्तार होईल. मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात घोषणा केलीच आहे, असे ते म्हणाले.

Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar On NCP: '' बॅनर लावून मुख्यमंत्री होता आले असते तर...''; सुधीर मुनगंटीवारांचा मिश्किल टोला

निवडणूक हास्य जत्रा नाही..

सोनु निगम हल्ल्याबाबत विचारले असता, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वात गृह विभाग चौकशी करत आहे. तपास सुरू आहे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले. प्रत्येक निवडणूक प्रत्येकच पक्ष आणि उमेदवार गांभीर्याने घेत असतो. निवडणूक काही हास्य जत्रा नाही.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक (By-Election)आम्ही मित्र पक्षांसोबत गांभीर्याने लढत आहोत. महाविकास आघाडीपण गांभीर्याने लढत आहे. जनता कोणाला आशीर्वाद देईल, हे निकालानंतर दिसणारच आहे. मात्र मला विश्वास आहे की मतदारसंघात वेगाने काम करण्यासाठी जनता भाजप-शिवसेनेला आशीर्वाद देईल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com