

Ajit Pawar And Jayant Patil : महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षानंतर पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर रविवारी (ता. २ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी ५४ आमदारांपैकी ३५ आमदारांसह बाहेर पडले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Latest Political Marathi News)
या सर्व घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला होता. रविवारी (ता. २) दुपारी सुरू झालेल्या या राजकीय भूकंपात जयंत पाटील यांनी काहीही भूमिका मांडली नाहीत. तर ते शरद पवार यांच्याबरोबर आहेत की अजित पवार यांच्यासह याबाबतही काही स्पष्ट होत नव्हते. याबाबत मात्र खुद्द शरद पवार यांनीच माहिती दिली. दुपारच्या शपथविधीनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्याबाबत माहिती दिली. शरद पवार म्हणाले, "जयंत पाटील हे सकाळी दहा वाजल्यापासून मुंबईच्या ऑफिसमध्ये बसून आहेत. पक्ष सोडून गेलेल्यांवर रितसर कारवाई होणार आहे. याबाबत पक्षातील वरीष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात येणार आहे." दरम्यान, जयंत पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. याबाबत जयंत पाटील यांनी ट्विट केले आहे.
जयंत पाटील ट्विटमध्ये फक्त दोन शब्द लिहीत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी ट्विट केले की, "मी साहेबांबरोबर..." असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच एक फोटोही पोस्ट केला आहे. यानंतर जयंत पाटील लवकरच पवार यांची भेट घेणार आहेत. तसेच प्रसारमाध्यमांशी संवादही साधणार आहेत. यामुळे सकाळपासून जयंत पाटील यांच्याबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.