Badlapur Politics : एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराची माघार, राष्ट्रवादीने गुलाल उधाळला; बदलापूरच्या उपनगराध्यक्षपदी प्रियांका दामले

Priyanka Damle NCP VS shivsena : कुळगाव-बदलापूर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला.
Priyanka Damle Deputy Mayor Kulgaon Badlapur
Priyanka Damle Deputy Mayor Kulgaon Badlapursarkarnama
Published on
Updated on

मोहिनी जाधव

Badlapur Municipal Council : कुळगाव–बदलापूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. भाजप–राष्ट्रवादी एकत्रित गटाकडे २६ सदस्यसंख्या असल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका दामले यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.

यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून अ‍ॅड. संदेश ढमढेरे यांची उमेदवारी दाखल करण्यात आली होती. मात्र सभागृहातील राजकीय समीकरण पाहता भाजप–राष्ट्रवादी युतीकडे बहुमत असल्याने उपनगराध्यक्ष पद युतीकडे जाणे निश्चित होते. हे लक्षात घेऊन शिवसेना शिंदे गटाने समजूतीच्या धोरणाचा अवलंब करत आपल्या उमेदवार संदेश ढमढेरे यांची उमेदवारी मागे घेतली. परिणामी सर्व सदस्यांच्या एकजुटीने प्रियांका दामले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

पदभार स्वीकारताना दामले यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानत, शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. नगराध्यक्षा रुचिता घोरपडे व मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी त्यांना अधिकृत पदभार सोपवला. नव्या जबाबदारीसह बदलापूर पालिकेत महिलाराज आला असून आता शहरातील महिलांच्या समस्यांवर प्रामुख्याने प्राधान्य देणार असल्याचे यावेळी प्रियंका दामले यांनी सांगितले.

Priyanka Damle Deputy Mayor Kulgaon Badlapur
Kolhapur Mahapalika: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात प्रतिष्ठा पणाला, आबिटकरांसह आमदारांचा करिष्मा चालणार का?

उपनगराध्यक्ष पदाची निवड जाहीर होताच सभागृहाबाहेरील दालनात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. फटाके फोडून, घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. युतीच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवड म्हणजे स्थैर्यपूर्ण व विकासाभिमुख राजकारणाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र याच सभागृहात पुढे स्वीकृत सदस्यांच्या निवडीवेळी वातावरण तापले आणि राजकीय तणाव पाहायला मिळाला.

स्वीकृत सदस्य निवडीत वादंग

उपनगराध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाल्यानंतर एकूण ४९ नगरसेवक व नगराध्यक्ष मिळून ५० या संख्येनुसार पाच स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. या वेळी भाजप–राष्ट्रवादी युतीने आपल्या २६ सदस्यांच्या संख्येच्या आधारे तीन स्वीकृत सदस्यांची मागणी केली. मात्र ‘दहा सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य’ या सूत्राचा दाखला देत शिवसेना शिंदे गटाने या मागणीला विरोध केला.

या मुद्द्यावरून दोन्ही गटांतील नगरसेवकांमध्ये जोरदार वादंग झाले. यावर भाजपचे नगरसेवक राजेंद्र घोरपडे व संभाजी शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पत्र दाखवत, दावा करणाऱ्या गटांच्या तुलनेत ज्या गटाकडे सदस्यसंख्या जास्त आहे, त्याला अधिक स्वीकृत सदस्य मिळू शकतात, असे स्पष्ट केले. अखेर भाजप–राष्ट्रवादी युतीचे तीन व शिवसेना शिंदे गटाचे दोन असे पाच स्वीकृत सदस्य निवडण्यात आले.

स्वीकृत नगरसेवक

शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेवक हेमंत चतुरे व आगरी सेनेचे शहराध्यक्ष अरुण बैकर, तर भाजप–राष्ट्रवादी युतीकडून आदर्श विद्यामंदिर शाळेच्या विश्वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष तुषार आपटे, समाजसेवक शागोफ गोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांची निवड करण्यात आली.

Priyanka Damle Deputy Mayor Kulgaon Badlapur
Nashik NMC Election : दीपक बडगुजर विरुद्ध मुकेश शहाणेंमध्ये होणार 'टाइट फाइट', कोण कुणाला करणार चितपट?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com