Kolhapur Mahapalika: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात प्रतिष्ठा पणाला, आबिटकरांसह आमदारांचा करिष्मा चालणार का?

kolhapur Mahapalika Shiv Sena News : शहरातील आमदारांचे राजकीय वजन ठरविणारी ही निवडणूक आहे. महायुतीतील जागा वाटपाच्या बैठकीत ताणून धरले अन् तुटताना सोडून देऊन शिवसेनेने स्थान दाखवून दिले.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News:कोल्हापूर शहराला शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. दोन वेळा अपवाद वगळता विधानसभेला शिवसेनेचेच प्रतिनिधी विधानसभेत गेलेत. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा करिष्मा कधीच चालला नाही. त्यामुळे यंदा महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निश्चय शिवसेनेने केला आहे.

महायुती सोबत युती करत असताना तब्बल 30 जागांवर धनुष्यबाण लढणार आहे. शिवसेना दुभंगल्यानंतर ठाकरेंची सेना काँग्रेस सोबत तर शिंदेंची सेना भाजपसोबत एकत्र आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेकडे सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. शहरातील विद्यमान आमदार आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली असून बालेकिल्ला मिळवण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे.

महापालिकेवर भगवा फडकवायचाच, या जिद्दीने आता महायुतीने मोट बांधली आहे. पूर्वी शहर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. आता पुन्हा एकदा शहरात शिवसेनेची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे.

शहरातील आमदारांचे राजकीय वजन ठरविणारी ही निवडणूक आहे. महायुतीतील जागा वाटपाच्या बैठकीत ताणून धरले अन् तुटताना सोडून देऊन शिवसेनेने स्थान दाखवून दिले. अखेरच्या क्षणी ३० जागा घेतल्या. यातूनच महापालिकेत शिवसेनेचे वर्चस्व दाखविण्यासाठी पहिल्या दिवसापासून शड्डू ठोकल्याचे दिसून येते.

पूर्वी शहर म्हणजे 'शिवसेना'असे एक समीकरण होते. महापालिकेत गतवेळी काँग्रेससोबत असलेली शिवसेना आता भाजपसोबत महायुतीत आहे. पूर्वीची सर्वच समीकरणे आता बदलली आहेत.

विशेष म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा शिवसेनेचे पालकमंत्री आहेत. शहरात थेट शिवसेनेचे आमदार आहेत. आजपर्यंत शिवसेनची सत्ता कधीही महापालिकेत आलेली नाही. त्यामुळे शहर शिवसेनेचा बालेकिल्ला ठरविण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर जोराचे प्रयत्न करीत आहेत.

यासाठी महायुतीतील जागा वाटपात आमदार क्षीरसागर यांनी आक्रमक बाजू मांडत अधिकाधिक जागा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महायुती तुटण्यापर्यंत ताणल्यावर पालकमंत्री आबिटकर यांनी संयमाची भूमिका घेतली. विरोधकांच्या निगेटिव्ह नेरेटीव्हला सडेतोड उत्तर देण्याची तयारी ठेवली आहे.

निधीचे जोरदार मार्केटिंग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा किंवा रोडशो, आलेल्या निधीचे जोरदार मार्केटिंग, भविष्यातील योजनांचा आश्वासक प्रचार, विरोधकांनी वेळीच रोखण्याची तयारी, आवश्यकता भासल्यास वेळीच आक्रमक भूमिका, प्रत्येक भागातील महत्त्वाच्या व्यक्तींवर, मंडळांवर लक्ष केंद्रित करणे, अशा वेगवेगळ्या माध्यमांतून शिवसेना आता निवडणूक लढवित आहे.

Kolhapur Municipal Corporation
Parbhani News: परभणीतही अजित पवारांकडून बारामती पॅटर्नचाच प्रचार, विरोधक म्हणतात तुम्हीच शहराची वाट लावली!

शहरातील वर्चस्वासाठी व्यूहरचना सध्या शिवसेनेकडे आयात उमेदवार अधिक आहेत. त्यांना महापालिकेचा अनुभव आहे. यातून शहरातील सर्व भागांत त्यांचे वर्चस्व निर्माण होईल, अशी व्यूहरचना आखली आहे. सत्ता आहे, पक्ष आर्थिक सक्षम आहे, निधी खेचून आणण्याची ताकद नगरविकासमंत्री आणि उपमुख्यमंत्री खुद्द पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याचाही फायदा निवडणुकीत घेतला जात आहे. आजपर्यंत आणलेला निधी, भविष्यातील नियोजित कामे, हद्दवाढ या प्रश्नांवर शिवसेनेने लक्ष केंद्रित केले आहे.

दुहेरी उद्देश शहरातील शिवसेनेचे वर्चस्व हे केवळ पक्षासाठी महत्त्वाचे नाही, तर काँग्रेसला बाजूला कारण्यासाठीही मोठी संधी मानली जात आहे. सध्या काँग्रेसचा महापालिकेवर असलेला वरचष्मा काढून शिवसेनेला उभारी देण्यासाठी ही मोठी संधी आहे. शिवसेनेला पुन्हा बालेकिल्ला करण्यासाठी आणि आमदारांचे राजकीय वर्चस्व टिकविण्यासाठी महापालिकेत अधिकाधिक उमेदवार शिवसेनेचे निवडून येणे अपेक्षित आहे. यातूनच पुढील राजकीय दिशा ठरणार आहे.

पालकमंत्र्यांची टीम खानविलकर पेट्रोल पंप येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून 'फिल्डिंग' लावत आहे. शनिवार पेठेतली 'शिवालय' येथून आमदार स्वतः सूक्ष्म नियोजन करत आहेत. येथे आमदार पुत्र निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे महापालिकेत, शहरात पालकमंत्री आणि आमदारांचे किती वजन आहे, हे ठरविणारी ही निवडणूक होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com