MNS Politics : अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; राजसाहेबांनी आदेश दिल्यास पुणेच काय बीडमधूनही...

Loksabha Election 2024 : मोर्चासाठी पुण्यात आलेल्या अमित राज ठाकरे यांनी दर्शवली मोठी तयारी
Raj Thackeray, Amit Thackeray
Raj Thackeray, Amit ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune Political News :

पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही. अशातच पुण्यात आलेले मनसे नेते अमित ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनीही पुण्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पुणे लोकसभेसाठी कोणत्या नेत्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, याबाबत चर्चा रंगल्या आहेत. सर्वच पक्षातील इच्छुक आपापल्या परीने उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. यातूनच रोज नवनवीन नावे समोर येत आहेत. त्याचबरोबर दिग्गज नेतेही चाचपणी करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यातूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनीही पुण्यातून निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे.

Raj Thackeray, Amit Thackeray
Amit Thackeray Andolan at Pune University : मनसेच्या मोर्चात विद्यार्थी कमी अन् कार्यकर्तेच जास्त

आज मनसेकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरती अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या पूर्वसंध्येला अमित ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये पुण्याशी जोडलेल्या नाळेविषयी सांगितले.

मी लहानपणापासून पुण्यात येत आहे. आता पुणे बदलत आहे. बदलत्या पुण्याबरोबर बऱ्याचशा समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे अमित ठाकरे म्हणाले.

मनसेकडून पुणे लोकसभा लढवण्यासाठी वसंत मोरे (Vasant More) आणि साईनाथ बाबर (Sainath Babar) हे इच्छुक आहेत. त्याचबरोबर अमित ठाकरे यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. यावर अमित ठाकरे म्हणाले, राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुण्यात काय बीडमधूनदेखील निवडणूक लढू शकतो, पण मी स्वतःहून लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवण्याचा अद्याप विचार केलेला नाही, हेही अमित ठाकरेंनी स्पष्ट केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन पक्षांचे चार गट पडले आहेत. यामुळे पुणेकरांसह विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे काहीसं दुर्लक्ष झालं आहे. कुलगुरूंनी सूत्रं हाती घेऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. तरीही विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा, जेवणाचा प्रश्न सुटलेला नाही. तसेच अनेक वर्षांपासून मराठी भाषा भवनचे काम अपूर्ण आहे. विद्यार्थ्यांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय कारकिर्दीतला पहिला गुन्हा अंगावर घेण्यास मी तयार आहे, असे अमित ठाकरे म्हणाले. मात्र, आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू राहणार आहे. आगामी काळात मनसे विद्यापीठातील सेनेट निवडणूक लढवणार असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती नेहमी जागरूक राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Avinash Chandane)

R

Raj Thackeray, Amit Thackeray
Loksabha Election 2024 : आता धंगेकर घरी बसणार; फडणवीसांची पाठराखण करताना मुळीकांकडून धंगेकरांचा समाचार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com