Bharat Jodo Yatra : 'भारत जोडो'च्या समारोपाकडे राष्ट्रवादी-शिवसेनेची पाठ; पटोले, चव्हणांचीही अनुपस्थिती

Rahul Gandhi : काँग्रेसकडून आघाडीतील पक्षांना निमंत्रणही देण्यात आलं होतं. मात्र, तरीही...
Bharat Jodo Yatra :
Bharat Jodo Yatra : Sarkarnama

Congress : काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज काश्मीरमध्ये समारोप झाला. या समारोपाच्या कार्यक्रमावेळी येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असतानाही राहुल गांधींनी जोरदार भाषण केलं.

तर या ‘भारत जोडो यात्रे’च्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी देशातील विविध पक्षाच्या नेत्यांना काँग्रेसच्यावतीने निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, या यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही पाठ फिरवली असल्याचे समोर आले आहे.

Bharat Jodo Yatra :
Shrigonda News : श्रीगोंदे ‘खरेदी-विक्री’ची निवडणूक बिनविरोध होणार?; पाचपुते, जगताप, नागवडेंना प्रत्येकी तीन जागा...

एकीकडे महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळला. तर दुसरीकडे मात्र, यात्रेच्या समारोपाला राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनीच पाठ फिरवली. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अस्तित्व धोक्यात तर आले नाही ना? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

Bharat Jodo Yatra :
Shivsena News : शिंदे गटाकडून `बाप जैसा बेटा, भरलो जल्दी लोटा`, म्हणत खैरे पिता-पुत्रावर टीका..

‘भारत जोडो यात्रे’च्या समारोपाला महाराष्ट्रातील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे उपस्थित होते. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे श्रीनगरमध्ये असूनही कार्यक्रमाला गैरहजर होते.

या यात्रेच्या समारोपाला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे अनुपस्थित होते. या बरोबरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही याकडे पाठ फिरवली. तर बाळासाहेब थोरात हे आजारी असल्याने कार्यक्रमाला गेले नसल्याचे बोलले जात आहे.

Bharat Jodo Yatra :
Amol Kolhe News : आघाडीने बहिष्कार टाकलेल्या शिंदेंच्या बैठकीला कोल्हे एकटेच हजर; राजकीय चर्चा जोरात...

दरम्यान, काँग्रेसकडून आघाडीतील पक्षांना निमंत्रणही देण्यात आलं होतं. मात्र, तरीही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसच्या या ‘भारत जोडो यात्रेचा प्रवास आज तब्बल १३५ दिवसांनी थांबला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com