Sharad Pawar : शरद पवारांनी केंद्राची झेड प्लस सुरक्षा नाकारली; म्हणाले, "आधी धोका कशाचा आहे..."

Sharad Pawar denies Centre's Z Plus security : केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेली झेड प्लस सुरक्षा घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Sharad Pawar denies Z Plus Security
Sharad Pawar denies Z Plus SecuritySarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar denies Z Plus Security : केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेली झेड प्लस सुरक्षा घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नकार दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.

यामध्ये सीआरपीएफचे 58 कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार होते. मात्र, आपणाला अतिरिक्त सुरक्षेची गरज नसल्याचं पवार यांनी त्यावेळी देखील म्हटलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांनी केंद्र सरकार आपणाला ही सुरक्षा का देत आहेत? तसेच मला कोणत्या प्रकारचा धोका आहे? याची चौकशी करू आणि त्यानंतरच सुरक्षा घेण्याचा विचार करू, असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

तसंच या संबंधित सविस्तर माहिती त्यांनी गृह मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांकडून मागवली आहे. मात्र, सध्या तरी शरद पवारांनी (Sharad Pawar) केंद्राची झेड प्लस सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. मात्र त्यांनी ही सुरक्षा का नाकारली याचं कारण समजले नाही.

Sharad Pawar denies Z Plus Security
Harshvardhan Patil : नाराज हर्षवर्धन पाटील अजितदादांवर संतापले; म्हणाले, महायुतीचे...

दरम्यान, शरद पवार यांना केंद्र सरकार (Central Government) झेड प्लस सुरक्षा देण्याच्या मुद्द्यावर त्यांनी याआधीचं संशय व्यक्त केला होता. झेड प्लस सुरक्षा म्हणजे, आगामी निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असं त्यांनी म्हटलं होतं.

Sharad Pawar denies Z Plus Security
Shivaji Maharaj Statue: धक्कादायक: शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत प्रकाश आंबेडकर काय बोलून गेले?

पवारांना त्या अटी अमान्य…

झेड प्लस सुरक्षेसंदर्भातील काही अटी शरद पवार यांनी नाकारल्याची माहिती आहे . सुरक्षा दलाची गाडी वापरण्याचा आग्रह त्यांना करण्यात आला होता. मात्र, त्यांनी ती अट नाकारली. तसेच, घरात सुरक्षा कडं नसावं, अशी सूचना शरद पवारांनी केल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे तुर्तास तरी शरद पवारांनी केंद्राची झेड प्लस सुरक्षा नाकारली असली तरी ते भविष्यात ती स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com