Shivaji Maharaj Statue: धक्कादायक: शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत प्रकाश आंबेडकर काय बोलून गेले?

Prakash Ambedkar on shivaji maharaj statue collapsed Rajkot Fort: राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळल्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-अत्यारोप सुरु आहेत.या वादात प्रकाश आंबेडकरांनी आणखी भर घातल्याचे दिसते.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sarkarnama
Published on
Updated on

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणावरुन राजकारण तापलं असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळल्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-अत्यारोप सुरु आहेत.या वादात प्रकाश आंबेडकरांनी आणखी भर घातल्याचे दिसते.

"पुतळा कितीही कमजोर असला तरी पडू शकत नाही. त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेलाय?" असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची माफी का मागत नाही? असा सवास आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
VIDEO महायुतीत मिठाचा खडा; अजितदादांनी केली 'या' नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

26 ऑगस्टला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवरायांचा हा 40 फुटांचा हा पुतळा अचानक कोसळला. या घटनेमुळे राज्यात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या पुतळ्याची निर्मिती करणाऱ्या डिझायनर व कंन्सल्टिंग एजन्सीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Modi in Mumbai : VIDEO मोदी मुंबईत; काँग्रेस नेत्याच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा

वाऱ्याचा अंदाज न घेताच नौदल अभियंते व पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा याठिकाणी बसवलाच कसा?, त्यामुळे त्यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करत आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.याचिकेवर पुढील आठवड्यात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपााध्याय व न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com