Jayant Patil News : असे असताना केंद्र आणि राज्य सरकार मात्र प्रचारात व्यस्त, हे दुर्दैव - जयंत पाटील

Rohit Pawar News : आमदार रोहित पवार यांनीही 'या' मुद्द्यावरून केली आहे टिप्पणी, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama

Jayant Patil and State Govt : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार कमी भाव, कापूस उत्पादक शेतकऱ्याचे झालेले नुकसान आदी मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jayant Patil
Sule Vs Fadnavis : ''पार्टटाईम गृहमंत्रिपद सांभाळण्यापेक्षा सरळ ...'' सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला !

जयंत पाटील म्हणतात , ''राज्य आणि केंद्र सरकारने मराठवाडा, विदर्भातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. उत्पादन खर्चही निघत नाही, इतका नीचांकी बाजारभाव शेतमालाला दिला जातोय. परतीचा पाऊस समाधानकारक झालेला नाही, त्यामुळे रब्बी पिकांकडूनही फारशी अपेक्षा नाही.''

याशिवाय, ''सोयाबीनचे दर हे हमीभावापेक्षाही कमी आहेत, याला सरकारचे खाद्यतेल आयातीचे धोरण कारणीभूत आहे. सरकारने गेल्‍या वर्षभरात खाद्यतेल आयातीवरील शुल्‍क ३५ टक्‍क्‍यांवरून ५.५० टक्‍क्‍यांवर आणले. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात झाले. परिणामी सोयाबीनचे देशांतर्गत भाव पडले,'' असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.

याचबरोबर ''देशातील कापूस पिकाला यंदा पाऊस आणि कीड-रोगांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळं उत्पादन ३०३ लाख गाठींवरच स्थिरावले. देशातील कापूस उत्पादन २००९-१० नंतर पहिल्यांदाच या पातळीवर पोहोचले. शेतकरी संकटात सापडलेला असताना केंद्र आणि राज्य सरकार मात्र प्रचार करण्यात व्यस्त आहेत, हे दुर्दैव म्हणावे लागेल,'' अशा शब्दांमध्ये जयंत पाटील यांनी टीका केली आहे.

Jayant Patil
Manoj Jarange Patil : स्टेजवरचं कोसळणं, हाताची थरथर अन् आता माईक पकडणंही अवघड; सरकार जरांगेंचा किती अंत पाहणार..?

संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करावा - रोहित पवारांची मागणी

आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला आहे. त्यांनी म्हटले की, ''कर्जत-जामखेडसह नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात जून महिन्यात जेमतेम पाऊस झाला. जुलैनंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पावसाचा मोठा खंड होता. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या कालावधीत केवळ दोन-तीन दिवस पाऊस पडला आणि नंतर गायब झाला. आतापासूनच अनेक ठिकाणी शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. ऑक्टोबर महिन्यातच विहिरी आटायला लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. ''

''उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह बहुतांशी भागात हीच परिस्थिती आहे, परंतु राज्य सरकारने केवळ ठराविक ४० तालुक्यांतच दुष्काळ जाहीर केला आहे. नगर, परभणी, नांदेड, अमरावती, वाशीम, अकोला हे जिल्हे तर वगळलेच आहेत. शिवाय जळगाव, लातूर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतून केवळ एकाच तालुक्याचा समावेश केलाय.''

''अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन-तीन दिवसांत तुरळक पाऊस पडला असला तरी दोन महिने मात्र खंड होता. याबद्दल शासनाने गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. तांत्रिक निकषात काही अडचणी येत असल्या तरी आपल्याला केवळ तांत्रिक विचार करून चालणार नाही, तर वस्तुस्थितीही समजून घ्यावी लागेल. म्हणूनच कर्जत-जामखेडसह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करावा, ही विनंती!'' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com