Manoj Jarange Patil : स्टेजवरचं कोसळणं, हाताची थरथर अन् आता माईक पकडणंही अवघड; सरकार जरांगेंचा किती अंत पाहणार..?

Maratha Reservation Protest : ...न्याय मिळेपर्यंत पाणी पिणार नाही.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मनोज जरांगे पाटील हे नाव मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. पहिल्यावेळेस १७ दिवस तर आता सलग आठव्या दिवशीही सुरू असलेल्या बेमुदत उपोषणामुळे जरांगे पाटलांनी शिंदे -फडणवीस -पवार सरकारची पुरती कोंडी केली आहे, पण आता मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या लढ्याने एकीकडे हिंसक वळण घेतले असतानाच दुसरीकडे जरांगे पाटलांची तब्येत दिवसागणिक खालावत चालली आहे.

अन्नत्यागासह कधी नेत्यांच्या तर कधी आंदोलकांच्या आग्रहाखातर पाणी घेतलं तर घेतलं, अन्यथा तेही नाही अशा अवस्थेत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) खिंड लढवणं सुरू ठेवलं आहे. अन्न न घेतल्यामुळे ते स्टेजवर कोसळले होते. नंतर माध्यमांशी संवाद साधताना हाताचं थरथरणं आणि आता त्यांना माईक हातात धरणेही अवघड होत असल्याचे दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
Sule Vs Fadnavis : ''पार्टटाईम गृहमंत्रिपद सांभाळण्यापेक्षा सरळ ...'' सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला !

आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी न्याय मिळेपर्यंत पाणी पिणार नाही. पुरावे असूनही सरकार मराठ्यांना जाणुनबुजून आरक्षण देत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच काही जातींना पुरावे नसताना आरक्षण दिलं. मात्र, मराठा समाजाला आरक्षणासाठी कठोर लढाई लढावी लागणार असल्याचे सांगत होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार राहील, असा थेट इशाराच जरांगे-पाटलांनी दिला आहे. यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत. (Maratha Reservation)

जालन्याच्या अंतरवाली-सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषण सुरू आहे. वैद्यकीय उपचार न घेण्यावर मनोज जरांगे पाटील कायम आहेत. जरांगे पाटील यांची प्रकृती खूपच खालावली आहे. त्यांना धड उभंही राहता येत नाही. जरांगे पाटील स्टेजवरच कोसळले. त्यावेळी त्यांना तिथे असलेल्या दोघांनी सावरलं. आधार दिला.

" मागील 62 दिवसांपासून घराचा उंबराही..."

अंतरवाली सराटी येथील सभेवेळी मुलगी पल्लवीला चक्कर आली. त्यावेळी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्याशी बोलणे झाले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील मराठा समाजबांधव आत्महत्या करत आहेत. त्यासाठी सर्वस्वी राज्य शासन जबाबदार आहे. मागील ६२ दिवसांपासून जरांगे पाटलांनी आपल्या घराचा उंबराही शिवलेला नाही, असेही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. त्या शपथेला जागून शिंदे यांनी लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजबांधव आत्महत्या करत आहेत. मराठा समाजबांधवांना विनंती आहे की, आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका, असे आवाहन सुमित्रा जरांगे यांनी केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Manoj Jarange Patil
Maratha Reservation News : या पठ्ठ्याला मानलं ! शिंदेंना काढलं अन् जरांगेंना आणलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com