Mumbai North-East Constituency Result : महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले खासदार संजय दीना पाटील यांची उल्हासनगरातील राष्ट्रवादीचे(अजित पवार) जिल्हाध्यक्ष भारत(गंगोत्री)राजवानी यांनी भेट घेऊन राजकारणा पलीकडची मैत्री जपली आहे.
2001 साली संजय पाटील(Sanjay Patil) हे राष्ट्रवादीचे स्टुडंट विंगचे अध्यक्ष होते.तेंव्हा राजकारणात नसलेले भारत गंगोत्री यांना कल्याण मधील एका किचकट प्रकरणात संजय पाटील यांनी सहकार्य केले होते.तेंव्हापासून भारत गंगोत्री यांनी संजय पाटील यांना राजकीय गुरू मानून राजकारणात प्रवेश केला आहे.
भारत गंगोत्री(Bharat Rajwani) हे सलग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक पदावर निवडून आले आहेत. पक्षाची फाटाफूट झाल्यावर ते अजित पवार सोबत राहिले असून ते जिल्हाध्यक्ष पदावर काम करत आहेत. तसेच संजय पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत असले तरी संजय पाटील यांच्याशी भारत गंगोत्री यांची घनिष्ठ मैत्री आहे.
याचे प्रमाण सिद्ध करत त्यांनी संजय पाटील हे खासदार म्हणून निवडून आल्यावर त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भारत गंगोत्री यांची मुले देव राजवानी,पुरब राजवानी,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष विकास खरात,आकाश प्रेमचंदानी,किरण होतवानी, देव राजवानी,विपुल मयेकर,विजय,जीतू तेजवानी आदि उपस्थित होते.
मुंबई उत्तर पूर्व मतदाससंघात भाजपचे मिहिर कोटेचा आणि ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात लढत दिसत असली तरी येथील खरा संघर्ष उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यातच होता. ठाकरेंच्या संजय दिना पाटील यांना पराभूत करण्यासाठी फडणवीसांनी सर्व चाली खेळल्या. मात्र त्यावर मात करत ठाकरेंनी कोटेचा यांच्यासह फडणवीसांना आस्मान दाखवत पाटलांचं दिल्लीचे तिकीट फिक्स केले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.