Amol Kirtikar : मुंबईत अमोल किर्तिकरांचा गेम शिंदेंनी नव्हे 'नोटा'ने केला

Ravindra Waikar vs Amol Kirtikar Vote Counting : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी अनेकांची धाकधूक वाढवणारी ठरली. या मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार केवळ 48 मतांच्या फरकाने विजयी झाले.
Amol Kirtikar, Eknath Shinde
Amol Kirtikar, Eknath ShindeSarkarnama

Ravindra Waikar vs Amol Kirtikar : देशातील जनतेला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल अखेर 4 जूनला जाहीर झाला. या निकालात देशासह राज्यात अनेक ठिकाणी अनपेक्षित असा कौल मतदारांनी दिल्याचं पाहायला मिळालं. तर अनेक ठिकाणी अगदी मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोण विजयी होणार याबाबतची स्पष्टता आली नव्हती.

खासकरुन मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी अनेकांची धाकधूक वाढवणारी ठरली. या मतदारसंघातील उमेदवार केवळ 48 मतांच्या फरकाने विजयी झाला. महत्वाची बाब महत्वाची बाब म्हणजे या मतदारसंघातील मतदारांनी तब्बल 15 हजारांहून अधिक मतं 'नोटा'ला दिली आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर आणि शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात चुरशीची लढत झाली.

रवींद्र वायकर हे कीर्तिकरांपेक्षा केवळ 48 मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यामुळे अमोल कीर्तिकरांचा घात 'नोटा'च्या (NOTA) मतामुळेचं झाल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालात महाराष्ट्रातात महायुतीला चांगला धक्का बसला. 45 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलेल्या महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं. तर, महाविकास आघाडीने 30 जागा जिंकून युतीला मोठा धक्का दिला.

या निवडणुकीत मराठवाड्यात शरद पवारांचा आणि मुंबईत उद्धव ठाकरेंचाच (Uddhav Thackeray) करिष्मा असल्याचं दिसून आलं. मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांपैकी 4 जागांवर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. तर, दोन जागांवर युतीचे उमेदवार विजयी झाले. आश्चर्याची बाब म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीनंतर मुंबईतील सर्व जागांवर नोटाला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत.

Amol Kirtikar, Eknath Shinde
Chandrashekhar Bawankule : काय बोलावं? अद्दल घडूनही बावनकुळे भानावर येईनात!

राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेल्या आणि मतदारांना विचारात न घेता पक्षाशी, विचारधारेशी तडजोड करणाऱ्या नेत्यांपेक्षा मतदारांनी 'नोटा'ला पसंती दिल्याचं या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मुंबईतील मतदारांनी आपली नाराजी 'नोटा'द्वारे व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील अमोल कीर्तिकर यांना शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र वायकरांपेक्षा केवळ 48 मतं जास्त मिळाली. तर याच मतदारसंघात 'नोटा'ला मात्र 15,161 मते मिळाली. त्यामुळे आता नोटाच्या मतांमुळेच कीर्तिकरांचा गेम केल्याचं बोललं जात आहे.

मुंबईतील सहा मतदारसंघात नोटाला मिळालेली मतं -

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात 15 हजार 161 इतकी मतं नोटाला मिळाली. तर दक्षिण मुंबईत 13 हजार 411 इतकं मतदान नोटाला झालं. दक्षिम मध्य मुंबईत 13 हजार 423 तर उत्तर पूर्व मुंबईत 10 हजार 173 मतं नोटाला मिळाली. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईत अनुक्रमे 13 हजार 346 आणि 10 हजार 669 मते नोटाला मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com