NCP Political Crisis: राष्ट्रवादी कुणाची ? निवडणूक आयोगात 'या' दिवशी होणार दूध का दूध पानी का पानी

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा गट बाहेर पडल्यानंतर आता खरी राष्ट्रवादी कुणाची असा प्रश्नही उपस्थित होत आहेत.
NCP Political Crises :
NCP Political Crises :Sarkarnama

NCP Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा गट बाहेर पडल्यानंतर आता खरी राष्ट्रवादी कुणाची असा प्रश्नही उपस्थित होत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी कोणतीही फूट पडली नाही, असा दावा अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे करत आहेत. पण दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते प्रफुल्ल पटेल मात्र राष्ट्रवादी आमचीच आणि पक्षाचे चिन्हही आपल्यालाच मिळणार, असा दावा करत आहेत. अशातच प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे आणि पक्ष कुणाचा यावरही लवकरच निर्णय होईल, असं सूचक विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. इतकेच नव्हे तर पक्षाची मान्यत आणि पक्षचिन्ह हे अजित पवार यांनाच मिळणार, असल्याचाही दावा पटेलांनी केला आहे.

NCP Political Crises :
One Nation One Election : 'एक देश, एक निवडणुकी'वर राहुल गांधी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, इंडिया म्हणजे..

येत्या ३० सप्टेंबरला निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यासंदर्भात सुनावणी होणार आहे आणि निकालही आमच्या म्हणजे अजित पवार यांच्या बाजूने लागेल. 43 आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे.आमच्या बाजूने सर्वाधिक लोक अजितदादांना पाठिंबा देणार आणि पक्षाचा दर्जा आणि चिन्हही आपल्यालाच मिळणार असा विश्वासही प्रफुल्ल पटेलांनी व्यक्त केला.

तसेच, आम्ही 'एनडीए'चे घटक म्हणून काम करत असून आमच्या तिन्ही पक्षात समन्वय आहे. तीन पक्ष एकत्रित येतात तेव्हा काही विषयात काम करताना अडचणी येतात.पण त्यावर समन्वयानेच तोडगा काढला जातो, असंही पटेलांनी स्पष्ट केलं.

NCP Political Crises :
Jalna Maratha Andolan : जालन्यात एसटीच्या सर्व फेऱ्या थांबवल्या ; एसटी महामंडळाचा निर्णय ; प्रवाशांची गैरसोय..

दरम्यान, राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याआधीच अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला मेलद्वारे आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे कळवले होते. त्यानंतर आयोगाने दोन्ही गटाना नोटीस बजावून उत्तरे मागवली होती. आयोगाने ८ सप्टेंबरपर्यंतची मुदत शरद पवार यांच्या गटाला दिली आहे. पण शरद पवार यांच्याकडे पक्षाचे अध्यक्ष असल्याचे भक्कम पुरावे असल्याचा दावा थोरल्या पवारांच्या गटाने केला आहे. या पुराव्यांच्या माध्यमातून शरद पवार यांचा गट निवडणूक आयोगात उत्तर दाखल करेल. त्यात पक्षात फूट पडली नसल्याचा दावा केला जाईल. दुसरीकडे, फुटीनंतर मात्र कुणाकडे किती आमदार आहेत, याचा निकालच निवडणूक आयोगासमोर येत्या ३० सप्टेंबरला लागणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com