Sharad Pawar News : '' महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला ७० ते ८० जागा मिळणार...'' ; शरद पवारांचं मोठं विधान

Mahavikas Aaghadi Political News : '' ...त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे कायमसाठी बंद !''
Sharad Pawar - Mahavikas Aaghadi
Sharad Pawar - Mahavikas AaghadiSarkarnama

Mumbai : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये इन्कमिंग - आऊटगोईंगला वेग आला आहे. याचधर्तीवर देशपातळीवर इंडिया तर राज्यात महाविकास आघाडी सत्ताधारी भाजपविरोधात लढण्याच्या तयारीत आहे.

या दोन्ही आघाड्यांचा एकमेव उद्देश हा भाजपला सत्तेपासून रोखणे हाच आहे. पण इंडिया आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा मुद्दा कळीचा ठरण्याची चिन्हे आहेत.याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार (Sharad Pawar) गटाची बैठक रविवारी पार पडली.या बैठकीला अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी आगामी निवडणुका आणि त्यांच्या तयारीवर चर्चा केली. यात त्यांनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला ७० ते ८० जागा मिळणार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Sharad Pawar - Mahavikas Aaghadi
Ajit Pawar News : अजित पवारांचा कोल्हापुरात नवा गौप्यस्फोट, म्हणाले, '' उध्दव ठाकरेंचं सरकार पडत होतं...''

पवार नेमकं काय म्हणाले ?

लोकसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे जिल्ह्यात पक्षबांधणीला सुरुवात करा. आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आपल्यालाच काम करायचं आहे. आपणच पक्ष पुढे घेऊन जायचा आहे, अशा सूचना शरद पवार यांनी बैठकीमध्ये दिल्या आहेत. त्यामुळे फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)चे दरवाजे कायमचे बंद झाल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

'' ....त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे कायमसाठी बंद !''

तसेच जे नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले आहेत. त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे कायमसाठी बंद असतील. पक्ष सोडून गेलेल्यांना आता पक्षात जागा नाही. तसेच महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७० ते ८० जागा मिळणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, अशा सूचना पवारांनी दिल्या आहेत.

Sharad Pawar - Mahavikas Aaghadi
Pankaja Munde News : भाजप नेत्या पंकजा मुंडेंची खदखद पुन्हा बाहेर; म्हणाल्या, '' एवढ्या वेळा नाकारले तरी...''

'' नेत्याची प्रतिमा वाढवण्यासाठी हे केलं जातंय...''

लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा करुन घेण्यासाठी अशाप्रकारचे काम केले जात आहे. यापेक्षा सामान्यांचे हित, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी अशा प्रश्नांकडे सध्याचे सत्ताधारी पाहात नाहीत. याची जाणीव लोकांना करु देण्यासाठी आम्ही त्यांच्यामध्ये जाऊन प्रचार करु. याचवेळी केंद्र सरकार काही ठराविक लोकांचा प्रचार करण्यासाठी जी-२० कार्यक्रमाचा वापर करत आहे. जी-२० नेत्यांसाठी तांब्याच्या -चांदीच्या भांड्याचा वापर मी कधी यापूर्वी ऐकला नाही. नेत्याची प्रतिमा वाढवण्यासाठी हे केलं जातंय, अशी टीका त्यांनी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com