Ashutosh Kale On NCP Crisis : भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध राहील; अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळेंचा विश्वास!

Ashutosh Kale On Ajit Pawar : सद्य परिस्थिती पाहता अजित पवार यांच्यासोबत जाणे योग्य राहील पण..
Ashutosh Kale On NCP Crisis
Ashutosh Kale On NCP CrisisSarkarnama

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. यादरम्यान नगर जिल्ह्यातील कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशितोष काळे (Ashutosh Kale) हे मात्र आपल्या परिवारासह विदेशात होते. मात्र राज्यात परत येताच त्यांनी अजित पवार यांची भेट घेत, त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. असे असले तरी आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP Crisis) भविष्यात एकसंध होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

Ashutosh Kale On NCP Crisis
Mansoon Session : अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेतेपदावरून पेच; काँग्रेस करणार दावा?

नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण सहा आमदार आहेत. यामध्ये संग्राम जगताप, नीलेश लंके, किरण लहामटे हे तीन आमदार यापूर्वीच अजित पवार यांच्या सोबत गेले आहेत. तर दुसरीकडे रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार यांच्या गटामध्येच राहणे पसंत केले. दरम्यान विदेशातून आलेले आशुतोष काळे यांनीही अजित पवार गटामध्ये उडी मारली.

आशुतोष काळे हे शरद पवारांचे विश्वासू आणि शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे जावई आहेत. तसेच जयंत पाटील हे चंद्रशेखर घुले यांच्या मोठ्या बंधूंचे मेहुणे आहेत. त्यामुळे एकूणच आशुतोष काळे जयंत पाटील आणि चंद्रशेखर घुले यांच्या नातेसंबंधातून शरद पवार गटात राहतील अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र त्यांनी अजित पवार यांच्या सोबत जाणे पसंत केले आहे.

Ashutosh Kale On NCP Crisis
Hasan Mushrif on Sharad Pawar : शरद पवार काय त्यांच्याकडच्या नेत्यांबाबत शब्दही काढणार नाही ; मुश्रीफांचे सूचक विधान

दरम्यान आशुतोष काळे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा घेतलेल्या निर्णयाबद्दल आपलं मत व्यक्त करताना शरद पवार आणि अजित पवार यांच्याप्रति काळे परिवाराची निष्ठा असल्याचे सांगितले. सद्य परिस्थिती पाहता अजित पवार यांच्यासोबत जाणे योग्य राहील, असं वाटल्याने माझा निर्णय घेतलेला आहे, मात्र त्याचबरोबर भविष्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही गट एकत्रित येतील आणि पक्ष एकसंध राहील असा मला विश्वास वाटतो, अशी आशा आशुतोष काळे यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com