Palghar ZP Member Arrested : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्याला अटक; खासदारांची बनावट सही अन् तब्बल १० कोटींची फसवणूक..

Palghar Politics : हबीब शेख यांच्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल करून..
Palghar News
Palghar NewsSarkarnama
Published on
Updated on

Palghar News : पालघर जिल्हा परिषदेच्या मोखाडा या तालुक्यात येणाऱ्या आसे परिषद गटच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य हबीब शेख (Habib shaikh) यांना सरकारची तब्बल दहा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पालघर पोलिसांकडून रात्री उशीरा अटक झाली. यामुळे पालघर जिल्हा राष्ट्रवादीत मोठी खळबळ माजली. (Latest Marathi News)

Palghar News
BJP News : भाजपने पुन्हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले!

पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावीत यांच्या नामे डुप्लिकेट पत्र तयार करून त्यावर बनावट स्वाक्षरी करून, तब्बल दहा कोटी रूपयांची कामे मंजूर करण्यात आली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. खुद्द खासदार गावीत यांनी याबाबत तक्रार केली आहे. तक्रार दिल्यानंतर हबीब शेख यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून, त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. सध्या पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत.

Palghar News
Ambadas Danve-Kirit Somaiya : सोमय्या संभाजीनगरात गुपचूप येऊन गेले, दानवेंना नोटीस देऊन गेले..

मोखाडा विभागासाठी मोखाडा-खोडाळा असा विहीगाव राज्यरस्ता 78 या कामासाठी खासदार यांनी शासनाकडे केलेल्या मागणीनुसार, शासनाने १० कोटींच्या कामाला मंजुरी दिली होती. या कामाच्या मान्यतेसाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विद्यमान खासदारांनी चौकशी केली असता, मंजूर झालेल्या कामाचा पाठपुरावा करताना, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे हबीब शेख यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com