Uddhav Thackeray Meet Ajit Pawar : अजित पवारांची भेट का घेतली? उद्धव ठाकरे म्हणाले, "चुकीचा पायंडा.."

Udhhav Thackeray Meet Ajit Pawar in Assembly : "राजकारणामुळे आपले शेतकरी आहे, राज्यातल्या नागरिकांच्या प्रश्नाकडे..ठ
Ajit Pawar Uddhav Thackeray
Ajit Pawar Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपविरोधकांची सोमवार (ता. १७)पासून दोन दिवशीय बंगळुरू येथे बैठक पार पडली. पहिल्या दिवशी राज्यातून या बैठकीला शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. दरम्यान यानंतर आज विधिमंडळ अधिवेशनात कामकाजात भाग घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज विधिमंडळ सभागृहात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Latest Marathi News)

Ajit Pawar Uddhav Thackeray
NCP Crisis Update : राष्ट्रवादीत दक्षिण-उत्तरायण: शरद पवार बेंगळूरूत; तर अजित पवार दिल्लीला

यावेळी ठाकरे म्हणाले, "बंगळुरूमध्ये लोकशाहीप्रेमी आणि देशप्रेमी राजकीय पक्षांची आघाडी झाली आहे. आमच्या या आघाडीचं नाव INDIA आहे. यावेळी हुकूमशाहीच्या विरोधामध्ये बोललो. मी कोणा पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात नाही. देशभरात जो राजकीय पायंडा पडत चालला आहे, तो चुकीचा आहे.

Ajit Pawar Uddhav Thackeray
Parth & Jay Pawar Political Entry: अजित पवारांच्या होमपिचवर पार्थ आणि जय पवारांची दमदार एन्ट्री

अजित पवार यांची भेट का घेतली?

"मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी आता चांगलं काम करावं, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. राज्याला भेडसावणारे प्रश्न महत्त्वाचे आहेत. पाऊस सुरू झाला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. राजकारणामुळे आपले शेतकरी आहे, राज्यातल्या नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी विनंती मी अजित पवारांना केली आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com