Nia Raid isis : मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात 'इसिस'चा तळ ; 26/11 नंतरही मुंबई असुरक्षितच

Padagha borivali isis land : पडघ्यातील बोरिवलीमध्ये दहशतवादी इसिसचे मुक्त क्षेत्र
ISIS
ISISSarkarnama
Published on
Updated on

मुंबईसह महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाच्या सुरक्षेला किती धोका आहे, हे दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (NIA) टाकलेल्या छाप्यात स्पष्ट झाले आहे. गंभीर बाब म्हणजे NIA ने टाकलेल्या एकून 44 छाप्यांपैकी 31 छापे हे ठाणे ग्रामीण भागात होते. या कारवाईत मोहम्मद साकिब हमीद नाचन याच्यासह एकूण 15 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली गाव पुन्हा एकदा कुकर्मासाठी प्रकाशझोतात आले आहे.

पडघ्यामधील बोरिवली हे मुस्लीमबहुल लोकवस्तीचे गाव आहे. हे गाव इसिसचा तळ म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याच दृष्टीने दहशतवादी कारवाया करण्यासाठी या गावातून पुढाकार घेतला जात होता. दहशतवादी कारवाया करण्यासाठी हे गाव मुक्त क्षेत्र जाहीर करून त्याचे नाव अल्-शम असे ठेवण्यात आले. शिवाय देशभरातील धर्मांद मुस्लिमांचे डोके भडकावून त्यांना प्रशिक्षण देण्याची या गावात योजना होती, हे आता उघड झाले आहे. एवढे सर्व सुरू असताना स्थानिक पोलिसांना आणि राज्य गुप्त वार्ता विभागारा याचा पत्ता नव्हता, ही सर्वात मोठी गंभीर आणि धोकादायक बाब आहे.

ISIS
NIA Raid Against ISIS : मोठी बातमी! 'एनआयए'चे महाराष्ट्रात 40 ठिकाणी छापे; धक्कादायक माहिती समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठाणे जिल्ह्याचे आहेत. त्याच ठाणे जिल्ह्यातील पडघ्यामध्ये दहशतवाद्यांचा मोठा तळ असल्याचे या छापेसत्रातून स्पष्ट झाले आहे. यंदा पुण्यातील कोंढरी भागातून NIA ने इसिससी संबंधित काही दहशतवाद्यांना अटक केली होती. तेव्हा इसिसचे महाराष्ट्र मॉड्युल समोर आले होते. त्याच्या पुढील तपासात पडघ्यातून सूत्रे हलत असल्याचे लक्षात आले होते. यावेळी NIA ला आयबी आणि एटीएसने सहकार्य केल्यामुळे 44 ठिकाणी छापे टाकणे शक्य झाले.

नाचन कोण आहे?

साकिब नाचण हा इसिसमध्ये काम करणाऱ्यांना निष्ठेची शपथ देतो. तसेच मुस्लीम तरुणांची माथी भडकावण्याचीही जबाबदारी त्याच्यावर आहे. मुंबईत 2003 मध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्येही नाचनचा संबंध होता. त्यासाठी त्याला 10 वर्षांची शिक्षाही झाली होती. त्यानंतरही त्याच्या कारवाया थांबल्या नाहीत. लोकल ट्रेनमधील स्फोट घडवताना तो बंदी घातलेल्या सिमी संघटनेत सक्रिय होता. त्याच्यावर तीन हत्यांचे गुन्हेदेखील आहेत. तसेच आता त्याची मुलेही दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पडघ्यातील बोरिवलीविषयी

बोरिवली हे अंदाजे पाच हजार मुस्लीम वस्तीचे गाव आहे. गावातील एका बाजूला समतानगर ही दलित वस्ती आहे तर आनंदनगर ही आदिवासींची वस्ती आहे. गावात बाहेरून येणाऱ्या मुस्लिमांची संख्या वाढत आहे. भाडे मिळते म्हणून स्थानिक निश्चिंत आहेत. या गावात नेहमीच सत्तासंघर्ष सुरू असतो आणि पैशांसाठी गौण खनिज तस्करमध्येही अनेक लोक गुंतलेले आहेत.

२००३ मध्ये याच बोरिवलीमधून साकिब नाचनला अटक केल्यानंतर गावातील एका पडक्या विहिरीतून मोठा शस्त्रसाठा सापडला होता. त्यात अडीचशेहून अधिक हातबॉम्ब, रायफली आणि दारूगोळ्यांचा समावेश होता.

यंदा 26/11 च्या म्हणजेच मुंबई हल्ल्याला १५ वर्षे पूर्ण झाली. आजही मुंबईच्या आजूबाजूला दहशतवाद्यांचा तळ उभा राहतो आणि ही बाब दुर्लक्षित केली जाते. म्हणजेच मुंबई हल्ल्यानंतर आपण कुठलाही बोध घेतलेला नाही हे या निमित्ताने स्पष्ट झाले.

(Edited by Avinash Chandane)

ISIS
NIA-Pune Police : सीरियातून सूचना; पण पुणे पोलिसांनी उधळला साखळी बॉम्बस्फोटाचा कट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com