NIA-Pune Police : सीरियातून सूचना; पण पुणे पोलिसांनी उधळला साखळी बॉम्बस्फोटाचा कट

Terrorist Activities : ऑगस्ट २०२३ मध्ये पुणे शहरातून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.
 Pune Police
Pune PoliceSarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News ऑगस्ट २०२३ मध्ये पुणे शहरातून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या दहशतवाद्यांसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पकडलेल्या दहशतवाद्याकडून केलेल्या चौकशीतून दहशतवाद्यांनी पुण्यात साखळी बॉम्बस्फोट किंवा मोठा घातपात घडवून आणण्याचा कट रचला होता. सीरियातून या ‌दहशतवाद्यांना सूचना दिल्या जात होत्या, असेही चौकशीतून समोर आले आहे. (Pune Police)

महम्मद शाहनवाझ आलम याला एनआयए'ने याला नुकतीच अटक केली. कोंढवा परिसरातून शाहनवाझ पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. इतकेच नव्हे तर पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात यापूर्वी ज्यांना ज्यांना अटक करण्यात आली, त्या सर्व आरोपींशीही शाहनवाजचा थेट संबंध आहे.

 Pune Police
Drug Mafia Lalit patil : कर्नाटकात ड्रग्ज साम्राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न फसले!

चाकी चोरीच्या प्रयत्नात असताना १९ जुलै २०२३ रोजी पुणे पोलिसांनी कोथरूडमध्ये त्यांना अटक केली होती. महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी याच्यासह शाहनवाझ आलम अशी या तिघांची नावे आहेत. या प्रकरणात अधिक तपास केल्यानंतर आणि त्यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर या कटाचा पर्दाफाश झाला.

पुणे पोलिसांनी महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी यांना पकडल्यानंतर 'एनआयए'ने या दोघांचा ताबा घेऊन त्यांची चौकशी केली. या चौकशीत पुणे (Pune),मुंबईसह देशातील विविध शहरात आयसिस या दहशतवादी संघटनेच्या माध्यामूतन दहशतवादी (Terrorist Activities ) विचारधारेचा प्रसार आणि तरुणांची भडकाविण्याचे काम केले जात असल्याचे उघडकीस आले. पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. अदनान सरकार यालाही दहशतवादी विचारधारेचा प्रसार करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

या प्रकरणी एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पोलिस आयुक्त रितेशकुमार आणि पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांना पत्र लिहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि त्यांनी पकडलेल्या या दहशतवाद्यांमुळे देशभरातील संभाव्य दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यास एनआयए'ला यश आले आहे. पुण्यात दहशतवाद्यांचे स्पिलर सेल कशा पद्धतीने कार्यरत आहे. त्यांचे ब्रेनवॉशिंग कसे केले जाते, यासंदर्भात माहिती मिळणे एनआयएला शक्य झाले. असे म्हणत एनआयएचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पुणे पोलिसांवर पत्राद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

 Pune Police
Dada Bhuse News : मी तुरुंगातून निवडणूक लढवून भुसेंचा पराभव करणारच

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com