Maharashtra Politics : नीलेश राणे-भास्कर जाधव भिडले; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

Nilesh rane Vs Bhaskar Jadhav : सत्ताधारी लोकप्रतिनिधी वारंवार समाज विघातक कृत्ये करत असल्याने महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे.
Nilesh rane, ijay Wadettiwar,  bhaskar Jadhav
Nilesh rane, ijay Wadettiwar, bhaskar Jadhav sarkarnama
Published on
Updated on

Political News: आमदार भास्कर जाधव आणि नीलेश राणे यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. त्यामुळे चिपळूण शहरात शुक्रवारी (ता.16) मोठा तणाव निर्माण झाला. दगडफेकीची घटना घडली. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. 'चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा करण्यात आला. राडा संस्कृतीला सरकारकडून खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे राज्यातली कायदा सुव्यस्था धाब्यावर आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधीला सत्तेचा माज असल्याने हा राडा केला असून, हा सत्तेचा माज जनताच उतरवेल,' असे वडेट्टीवार म्हणाले.

Nilesh rane, ijay Wadettiwar,  bhaskar Jadhav
Manoj Patil Hunger Strike: मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषण करण्यास भाग पाडले?

महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून वारंवार गालबोट लावले जात आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी वारंवार समाज विघातक कृत्ये करत असल्याने महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. राज्यात कायदा सुव्यस्था राहिली नाही. सत्ताधारी आमदाराने पोलिस ठाण्यात गोळीबार केला. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झुंडशाहीने पोलिसांसमोर जीवघेणा हल्ला केला. आता चिपळूणमध्ये पोलिसांसमोर सत्ताधारी लोप्रतिनिधीने राडा केला. यामध्ये सर्वसामान्य जनतेसोबत पोलिसदेखील जखमी झाले. सत्तेचा दबाव पोलिसांवर असल्याने पोलिसांना बघ्याची भूमिका घ्यावी लागतेय, हे दुर्दैवी आहे, असेदेखील वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटले आहे.

पोलिसांनी गुंडांना पाठीशी घातले

चिपळूणमध्ये शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर पोलिसांनी कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु तसे न करता या गुंडांना पाठीशी घातले जात आहे. पोलिस एकतर्फी कारवाई करत आहेत. चिपळूणची संस्कृती बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आमदार भास्कर जाधव (bhaskar Jadhav) यांच्या संपर्क कार्यालयासमोरच मुद्दाम गोंधळ घातला गेला. यासाठी बाहेरून गुंड, हत्यारे मागविण्यात आली. हे सगळं कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणीदेखील वडेट्टीवार यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

कडक कारवाई करा

चिपळूणमध्ये पोलिस कर्मचारीही जखमी झाले. महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांची तोफफोड करण्यात आली. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले गेले. तरीदेखील सरकार पक्षीय भेद करून कारवाई करत असल्याचा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला आहे. दोषींवर पक्षीय भेद न करता कडक कारवाई करावी, अशी मागणीदेखील वडेट्टीवार यांनी केली आहे.

R

Nilesh rane, ijay Wadettiwar,  bhaskar Jadhav
Sanjay Raut : 'भाजपमुळे राज्याची संस्कृती बिघडली, काही टोळ्या...'; संजय राऊतांचा निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com