
Revelation of Mumbai Property Worth Crores : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोक आणि महाराष्ट्राविषयी गरळ ओकली होती. कुणाच्या पैशांवर महाराष्ट्र जगतोय, असे दुबे म्हणाले होते. मात्र, याच दुबेंनी राजकारणात येण्याआधी मुंबईत कोट्यवधींचा फ्लॅट खरेदी केला होता. त्यावेळी ते मुंबईतच एका कॉर्पोरेट कंपनीत संचालक होते. त्यामुळे महाराष्ट्राबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या दुबेंना कमाईसाठी मुंबईतच यावे लागले होते. आजही त्यांची मालमत्ता मुंबईत आहे.
मुंबईतील खार भागातील एका इमारतीमध्ये दुबेंचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट अत्यंत अलिशान असून त्याची सध्याची किंमत काही कोटींमध्ये असल्याची चर्चा आहे. फ्लॅटचा आकार 1680 चौरस फुटांचा असून या भागात तेवढ्या फ्लॅटची किंमत तब्बल 7 ते 8 कोटी रुपये सांगितली जाते. दुबेंनी हा फ्लॅट 2009 मध्ये खरेदी केला होता.
दुबे यांनी लोकसभेची पहिली निवडणूक 2009 मध्ये झारखंडमधून लढवली होती. तेव्हापासून ते सातत्याने निवडून येत आहेत. त्यांची ही चौथी टर्म आहे. पण खासदार होण्याआधीपासून कित्येक वर्षे ते मुंबईत होते. ते संचालक असलेल्या कंपनीचे कार्यालय मुंबईतच होते. 1993 ते 2009 या काळात या कंपनीचे कार्यालय मुंबईत होते.
दुबेंचा यांचा फ्लॅट आणि संचालक असलेली कंपनी मुंबईतच असल्याने त्यांची अनेक वर्षे कमाई मुंबईतूनच होत होती. आताही त्यांना हा फ्लॅट भाडेतत्वावर दिल्याची चर्चा आहे. त्यामाध्यमातूनही त्यांची कमाई सुरू आहे. त्यामुळे मुंबई, महाराष्ट्रावर आगपाखड करणाऱ्या दुबेंना अजूनही मुंबईची वाट धरावीच लागते.
दुबेंनी राज ठाकरेंसह मराठी लोक महाराष्ट्राविषयी वादग्रस्त विधाने केली होती. महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवा, आपटून आपटून मारू असे विधानही त्यांनी केले होते. आजही ते आपल्या विधानावर ठाम आहेत. आजही त्यांनी याबाबत पुन्हा एखादा राज ठाकरेंना आव्हान देत महाराष्ट्राबाहेर आल्यास आपटून आपटून मारण्याचा इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.