भगवद् गीता पठणावरुन भाजप-शिवसेनेत नवा अध्याय ; राणे भडकले

विद्यार्थ्यांनी गीता पठण करायचं नाही तर मग फतवा ए आलमगीरीचे पठण करायचे का?
Nitesh Rane, Uddhav Thackeray
Nitesh Rane, Uddhav Thackeraysarkarnama

पुणे : शिवसेना (shivsena)आणि भाजप नेते (bjp)यांच्यातील संघर्ष वाढत आहे. दोन्हीही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकमेकांवर गंभीर आरोप होत आहेत. आता महापालिकेच्या शाळेत भगवद् गीता पठणावरुन (Bhagavad Gita) नवा वाद निर्माण झाला. या विषयावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपचे नेते, कणकवलीचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. महानगरपालिकेच्या शाळेत भगवद् गीता पठणाच्या ठरावाची सूचना महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे भाजपच्या पदाधिकारी योगिता कोळी यांनी केली होती. याला समाजवादी पक्षाकडून विरोध केला जात आहे.

''आपल्याच देशात श्रीमद भगवद् गीतेच्या पठणाला विरोध होत असेल तर हे दुर्दैवी आहे,'' असे भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले. नितेश राणे यांनी याबाबत समाजमाध्यमांवर व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांना याबाबत कार्यवाही करीत महापालिकेच्या शाळांमध्ये लगेचच भगवद् गीता पठण सुरु करण्यासाठी महापालिकेतील संबंधीतांना आदेश द्यावे, अशी मागणी केली आहे.

आमदार नितेश राणे म्हणाले, ''भगवद् गीतेच महत्व जगाने ओळखलं आहे. त्याला विरोध करण्यासारखं काहीच कारण नाही. विद्यार्थ्यांनी गीता पठण करायचं नाही तर मग फतवा ए आलमगीरीचे पठण करायचे का?

Nitesh Rane, Uddhav Thackeray
NCB : समीर वानखेडे अडचणीत ; मद्य विक्री परवाना भोवणार? गुन्हा दाखल

''मला खात्री आहे हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून उद्धवजी ठाकरे या भगवद् गीता पठणाच्या विरोधाच्या दबावापुढे झुकणार नाहीत. लगेचच भगवद् गीता पठणाच्या मागणीला स्वीकारून महापालिकेतील संबंधीताना निर्देशीत करतील,'' असे राणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com