Nitesh Rane : नाना पटोलेंचा अपमान, मग महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस काय करते? भाजप आमदार नितेश राणेंनी डिवचले

Nitesh Rane on Congress : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी तयारीत असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी डावलले. हा नाना पटोले यांचा अपमान असून काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये कशी उभी आहे, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama

Mumbai : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदाच्या रेसमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. परंतु त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीला डिवचले. "नाना पटोले यांच्यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे एका निवडणुकीला उभे राहू शकत नाही. याची काँग्रेसने दखल घ्यावी. नाना पटोले यांचा हा अपमान नाही का? याचा विचार काँग्रेसने करावा", अशा शब्दात नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला डिवचले.

आमदार राणे महणाले, "नाना पटोले यांना अर्ज भरू नये, म्हणून यासाठी कोणाचा फोन केला होता. माझ्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांना फोन केला होता. त्यांना अर्ज भरू नये असे सांगितले होते". यासाठी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना संपर्क करण्यास नाना पटोले यांना सांगितले होते. परंतु नाना पटोले यांचा दिवसभर शरद पवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एक प्रकारे हा नाना पटोले यांचा अपमान होता. याबाबत काँग्रेसने विचार केला पाहिजे, असा सल्ला आमदार राणे यांनी काँग्रेसला दिला. नाना पटोले यांना याचे उत्तर द्यायचे नसतील, तर माझ्याकडे पुरावे आहेत. पवार साहेबांच्या नावाचा वापर करून उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांना विरोध केला असल्याचा दावा देखील आमदार नितेश राणे यांनी केला.

Nitesh Rane
Nitesh Rane : 'राहुल गांधी यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या'; नितेश राणे म्हणाले त्यांनी वारीत सहभागी होऊ नये

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतःची ताकद नाना पटोले यांच्या मागे उभे करू शकत नाही. मग काँग्रेस कोणत्या कारणामुळे महाविकास आघाडीमध्ये यांच्याबरोबर उभी आहे, असा देखील सवाल आमदार राणे यांनी केला. नाना पटोले प्रामाणिक असतील, तर त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अर्ज का भरला नाही, याची माहिती द्यावी, असे आव्हान देखील आमदार राणे यांनी दिले.

Nitesh Rane
Nitesh Rane : 'राहुल गांधी यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या'; नितेश राणे म्हणाले त्यांनी वारीत सहभागी होऊ नये

काँग्रेसने मानसिकता दाखवली

काँग्रेसने त्यांच्या ट्विटर हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा फोटो शेअर करून त्याखाली बैलबुद्धी, असं म्हटले आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधी सारखा त्यांच्याकडे बालबुद्धी आहे. ते तेवढाच विचार करू शकतात. त्याचे प्रदर्शन संसदमध्ये चांगल्या प्रकारे झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरात मान आहे. परंतु काँग्रेसने प्रदर्शन करून त्यांची मानसिकता दाखवली असल्याचे म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com