Nitesh Rane : कट्टर विरोधक नितेश राणे संजय राऊतांसाठी भावूक, अवघ्या सहा शब्दांत दिल्या सदिच्छा!

Nitesh Rane Sanjay Raut : संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. त्यामुळे ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून ते दूर आहेत. राऊत यांच्या प्रकृतीविषय माहिती मिळताच त्यांचे कट्टर विरोधक नितेश राणे यांनी ट्विट केले आहे.
Nitesh Rane, Sanjay Raut
Nitesh Rane, Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Nitesh Rane News : मंत्री नितेश राणे हे खासदार संजय राऊतांचे कट्टर विरोधक संजय राजाराम राऊत असे म्हणत ते टीका करत असतात. नितेश राणे यांच्या विरोधात संजय राऊतांनी मानहानीचे दावे देखील कोर्टात दाखल केले आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी आपल्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचा बिघाड झाला असून आपल्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले होते. राऊत हे प्रकृतीच्या कारणामुळे महाविकास आघाडी-मनसेच्या मोर्च्यात देखील सहभागी झाले नव्हते.

संजय राऊत यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच त्यांचे कट्टर विरोधक नितेश राणे यांनी ट्विट करत 'संजय राऊतजी काळजी घ्या लवकर बरे व्हा!' अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राणेंच्या या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संजय राऊत यांनी आपल्या प्रकृतीविषयी ट्विट करत सांगितले होते की, आपण सगळ्यांनी कायम माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. उपचार सुरू आहे मी यातून लवकरच बाहेर येईल.

Nitesh Rane, Sanjay Raut
NCP controversy : दंगल अन् पोलिसांना मारहाण करतो काय? आमदाराच्या स्वीय सहायकाला न्यायालयाचा दणका

वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलास आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारणन नवीन वर्षात आपल्या भेटीस येईल, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत संजय राऊत हे लवकरच बरे व्हावेत यासाठी त्यांनी सदिच्छा दिल्या आहेत. तर, आदित्य ठाकरे यांनी देखील काळजी घे संजय काका,प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस! आत्ताही तेच होईल, खात्री आहे, असे म्हणत लवकरच बरे होण्यासाठी संजय राऊत यांना सदिच्छा दिल्या आहेत.

Nitesh Rane, Sanjay Raut
DCC bank jobs Maharashtra : स्थानिक उमेदवारांना लॉटरी! जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील नोकरभरती प्रकरणी राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com