

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना सुरू आहे. राणेंच्या जुहू येथील बंगल्यासमोर शिवसैनिकांनी निदर्शने केली होती. यात मोहसीन शेख (Mohsin Shaikh) याला पोलिसांनी कपडे फाटेपर्यंत मारले होते. परंतु, याचेच त्याला बक्षीस मिळाले असून, त्याची बढती झाली आहे. यावरुन राणेंचे पुत्र व आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
नितेश राणे यांनी मोहसीन शेखच्या बढतीवरुन शिवसेनेला लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही. त्यांनी मोहसीन शेख याच्या बढतीच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबरोबबरचा फोटो आणि राणेंच्या जुहूतील बंगल्यासमोर तो पोलिसांचा मार खात असतानाचा फोटो ट्विट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणाऱ्या 'त्या' युवासेना कार्यकर्त्याची बढती. आज पण राणेंमुळे शिवसेनेत पदं मिळतात! सिर्फ नाम ही काफी है!
राणेंच्या जुहू येथील बंगल्यासमोर 24 ऑगस्टला आंदोलन करणारे युवासेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेंकांना भिडल्याने पोलिसांनी लाठीमार केला होता. यात मोहसीन शेख या युवासेनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. यात त्याचे कपडेही फाटले होते. त्याचे फोटो आणि व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता या मोहसीन शेखला बढती देण्यात आली असून, त्याची युवासेना सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे.
याबाबतचे ट्विट युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केले आहे. युवासेनेचा ढाण्या वाघ मोहसीन शेख ह्यांची युवासेना सहसचिव पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. दरम्यान, मोहसीन शेख याची पत्नी नादिया शेख ही राष्ट्रवादी काँग्रेसची शिवाजीनगर, मानखुर्द येथील नगरसेविका आहे. चार वर्षांपूर्वी मोहसीन शेख याने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याची पत्नी अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.